31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...
HomeLifestyleऑक्सिडाइज दागिन्यांची सध्या खूप क्रेझ

ऑक्सिडाइज दागिन्यांची सध्या खूप क्रेझ

जुन्या फॅशन आत्ता नवीन रुपामध्ये पुन्हा येऊ लागल्या आहेत.

करू ती फॅशन, असा आत्ताचा कल आहे. पूर्वीच्या काळी सोने, चांदीच्या दागिन्यांचे प्रस्थच काही और असायचे. हल्लीच्या मुलीना हिरे, प्लाटीनम, ऑक्साईड, टेम्पल ज्वेलरी आदी प्रकारच्या कृत्रिम इमिटेशन ज्वेलरी वापरायला आवडतात.

असाही एक काळ होता जेंव्हा पालक आपल्या मुलीच्या लग्नासाठीची तरतूद ती जन्माला आल्यापासूनच करत असतात. त्यामध्ये जास्त करून सोन्याचे विविध प्रकारचे दागिने, काही चांदीच्या वस्तू यांचा समावेश असायचा. जुन्या फॅशन आत्ता नवीन रुपामध्ये पुन्हा येऊ लागल्या आहेत. हल्लीच्या तरुणींमध्ये सोन्या चांदीपेक्षा ऑक्सिडाइज दागिन्यांची खूप क्रेझ दिसत आहे. हे दागिने स्टर्लिंग चांदीपासून बनवले जातात. ज्यामुळे, ते जास्त चमकत नाहीत आणि जास्त उठावदार पण दिसत नाहीत. त्यांचा असणारा नैसर्गिक रंग बराच काळ टिकून राहतो.

अगदी पारंपरिक दागिन्यांसारखाच या नव्या युगातील दागिन्यांचा लूक असतो फक्त धातूचा फरक. पण ऑक्सिडाइज दागिने हे भारतीय ते पाश्चिमात्य पेहरावांसोबत सहजपणे वापरता येतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हि रफ टफ कशीही वापरता येते, तिची जास्त काळजी करण्याची गरज भासत नाही.

कुर्ती किंवा सलवार सूटवर हे दागिने वापरायचे असतील तर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हा सर्वोत्तम पर्याय आहे. या लूकवर झुमके, नेकपीसपासून बांगड्या, ब्रेसलेटपर्यंत सर्व काही परिधान करता येते.

वेस्टर्न ड्रेसवर हे दागिने वापरणार असाल  तर, त्यासोबत गळ्यात एक मोठ पेंडांट असलेला नेकलेस घालू शकता. आजकाल सर्वत्र ऑक्सिडाइज्ड बांगड्या आणि विविध प्रकारच्या अंगठ्याही उपलब्ध असल्याने  त्यांचा देखील वापर करता येऊ शकतो.

या व्यतिरिक्त जर खण साडी नेसली असेल, तर सुंदर दिसण्यासाठी लांब मंगळसूत्र ते नेकलेस, नथ, बांगड्यांची विविधता, झुमके पुरेसे ठरतात. हल्ली महाविद्यालयीन मुलींमध्ये देखील हा दागिन्यांची खूप क्रेझ आहे.

RELATED ARTICLES

Most Popular