31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...
HomeEntertainmentअमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची थक्क करणारी किंमत

अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची थक्क करणारी किंमत

दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी कुटुंबाचा एक फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हा एकत्रित कुटुंबाचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, श्वेता बच्चन, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा सर्व दिसत आहेत.

पण चर्चा या फोटोमध्ये दिसणाऱ्या एका पेंटिंगची अधिक प्रमाणात होत आहे. फोटोमध्ये सर्व बच्चन कुटुंब सोफ्यावर बसलेले दिसत आहे आणि त्यांच्या मागे एक मोठे बैलाचे पेंटिंग होते. पेंटिंगमध्ये एक बैल आहे. सोशल मीडियावर या बैलाच्या पेंटिंगच्या किमतीवरून युजर्समध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. काहींनी त्याला पसंती दर्शवली आहे तर, काहीजण त्याची खिल्ली सुद्धा उडवताना दिसत आहेत. वेलकम चित्रपटातील मजनू भाई यांची ती पेंटिंग आहे का! असे विचारात आहेत.

ज्या कलाकाराने हि पेंटिंग बनवली आहे. दिवाळीच्या फोटोंमुळे लोकप्रिय झालेल्या या बैल पेंटिंगची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. अमिताभ बच्चन यांच्या ड्रॉईंग रूममधील या पेंटिंगची किंमत कोटी रुपायांच्या घरात आहे. ४ कोटी हे त्या पेंटिंगचे मूल्य आहे. हे चित्र मनजीत बावा (१९४१-२००८) कलाकाराने बनवले होते. मनजीत यांची खासियत म्हणजे भारतीय पौराणिक कथा आणि सुफी तत्त्वज्ञानावर आधारित चित्रे काढणे.  मनजीत बावांच्या चित्रांचा विषय मां काली, भगवान शिव हा आहे. याशिवाय निसर्ग, प्राणी, बासरीचा आकृतिबंध आणि माणूस आणि प्राणी एकत्र राहतील अशी कल्पना यांवर आधारित चित्रे ते काढत असत.

चित्रकला हे समृद्धीचे प्रतीक आहे. अमिताभ बच्चन यांचा दिवाळीचा फोटो पोस्ट झाल्यानंतरच जास्त प्रमाणात व्हायरल झाला. बच्चन कुटुंबाला एकत्र पाहून चाहते खूप आनंदी झालेत. पण या विशेष  बैलाच्या पेंटिंगने अनेक वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

RELATED ARTICLES

Most Popular