29.2 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeRatnagiriरत्नागिरी प्राणी संग्रहालयात पेंग्विनची जोडी - पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी प्राणी संग्रहालयात पेंग्विनची जोडी – पालकमंत्री उदय सामंत

एमआयडीसीतील शंभर कोटी रुपये खर्च करून पहिले प्राणी संग्रहालय रत्नागिरी होत आहे.

स्थानिकांनी येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करण्यापेक्षा समर्थन करायला हवे. तरच बेरोजगारी दूर होईल. लोटे (ता. खेड) येथे होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाचा विस्तारित १२०० कोटींचा प्रकल्प रत्नागिरी तालुक्यात होणार आहे. त्यादृष्टीने कंपनीशी चर्चा झाली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनची जोडी रत्नागिरीत होणाऱ्या प्राणी संग्रहालयामध्ये आणली जाणार आहे. एवढेच नव्हे तर पिसाळलेले प्राणी ठेवण्यासाठीही पिंजऱ्याची व्यवस्था केली आहे, असा चिमटा देखील त्यांनी विरोधकांना काढला. रत्नागिरी औद्योगिक विकास महामंडळाच्या नवीन अतिथीगृहाच्या इमारत उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, इमारत अतिशय सुंदर आणि देखणी वास्तू उभारली आहे. आमच्या व्यवसायाबद्धल काहींनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यातील ८० टक्के काम आर. डी. सामंत कंपनीला मिळतात. आज योगायोगाने या कार्यक्रमात त्याला उत्तर मिळाले. स्थानिक अनेक ठेकेदरांचा सत्कार केला. त्यामुळे ८० टक्के स्थानिक ठेकेदारांना उभे करण्याचे काम आम्ही केले. महाराष्ट्रातील चांगली प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे. प्राणी संग्रहालयाचे कंपाउंडचे काम होत आहे. राज्यातील सगळ्यात मोठी मेडिकल कॉलेजची इमारत कापडगाव येथे होणार आहे. एमआयडीसीतील शंभर कोटी रुपये खर्च करून पहिले प्राणी संग्रहालय रत्नागिरी होत आहे.

राणीच्या बागेत पेंग्विनची संख्या वाढत चालली आहे. मी आज आराखड्यामध्ये रत्नागिरीत पेंग्विन आणण्याचा निर्णय घेतला. पर्यटकांना ते बघायला मिळणार आहे. जगातल्या एका मोठ्या इंडस्ट्रीच्या घशामध्ये स्टरलाईटची जमीन जाणार होती. परंतु ती परत मिळवली. साडेपाचशे एकर जमीन पुन्हा एकदा एमआयडीसीच्या ताब्यात आली आणि तिथं फार मोठी रोजगार निर्मितीचे कारखाने आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular