पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी लाहोरमध्ये खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 88 धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा नियमित कर्णधार बाबर आझम या मालिकेत प्रमुख म्हणून परतला. त्याने पुनरागमन करत विजयाने सुरुवात केली. मात्र, पाकिस्तानी कर्णधार बॅटने फ्लॉप ठरला आणि 7 चेंडूत बाद झाला.तो फक्त 9 धावा करू शकला पण कर्णधार म्हणून पुन्हा एकदा त्याचे नाणे टी-20 इंटरनॅशनलमध्ये चालले आहे. किवी संघावरील विजयासह बाबर आझमने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीचीही बरोबरी केली आहे.बाबर आझमचा हा 100 वा T20 आंतरराष्ट्रीय सामना होता आणि तो 67 व्यांदा कर्णधार म्हणून दिसला. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाला 41 वा विजय मिळाला. दुसरीकडे, 2007 मध्ये भारताला T20 वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या एमएस धोनीने 72 सामन्यांमध्ये 41 विजय नोंदवले आहेत.या प्रकरणात बाबरने जिथे धोनीची बरोबरी केली आहे, तिथे त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंचला मागे टाकले आहे. या यादीत अफगाणिस्तानचा असगर अफगाण अव्वल तर इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन दुसऱ्या स्थानावर आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना शनिवारी लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात प्रथम खेळताना पाकिस्तानचा संघ 19.5 षटकात 182 धावांवर ऑलआऊट झाला. फखर जमान आणि सैम अयुब या दोघांनी 47-47 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 3 आणि बेन लिस्टर आणि अॅडम मिल्नेने 2-2 बळी घेतले.प्रत्युत्तरात पाहुण्या न्यूझीलंडचा संघ अवघ्या 94 धावांत गारद झाला. हारिस रौफने 17 धावांत चार आणि इमाद वसीमने दोन धावांत दोन बळी घेत किवी संघाचे कंबरडे मोडले. दुसऱ्या सामन्यात मालिकेत पुनरागमन करून किवी संघाच्या नजरा बरोबरीवर असतील, त्यानंतर घरच्या संघाला आघाडी मजबूत करायची आहे.