27.3 C
Ratnagiri
Thursday, March 13, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeMaharashtraपालघर केळवे समुद्रकिनारी, ४ जणांचा बुडून मृत्यू

पालघर केळवे समुद्रकिनारी, ४ जणांचा बुडून मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार समुद्राच्या पाण्यात ४ जण बुडल्याची माहिती मिळताच येथील स्थानिक मदतीसाठी धावले.

नाशिक येथील ब्रम्हा व्हॅली स्कूल या प्रसिद्ध अ‍ॅकेडमीतील ३९ जण केळवे समुद्रकिनारी सहलीसाठी आले होते. यात ११ मुली, २२ मुले आणि अ‍ॅकेडमीतील ६ शिक्षकांचा समावेश होता. ओहोटीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने, पाण्याबरोबर वाहत जाऊन केळवे समुद्रात बुडून नाशिक येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थाचा तर त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या एका स्थाऩिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, या मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या इतर मुलांची शोधमोहीम युद्धपातळीवर घेण्यात सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समुद्राच्या पाण्यात ६ जण बुडल्याची माहिती मिळताच येथील स्थानिक मदतीसाठी धावले. नाशिक येथील ब्रम्हा व्हॅली स्कूलचा एक मोठा गट पालघरमधील केळवे येथे फिरण्यासाठी आला होता. त्यातील हे विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील एक विद्यार्थी पाण्यात पोहण्यास म्हणून गेला असता तो बुडू लागला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी म्हणून बाजूलाच असलेल्या आदिवासी पाड्यातील एक मुलगा समुद्रात गेला. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाला. आणखी दोन जण बुडाल्याचे वृत्त असून घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.

फिरायला आलेल्या मुलांपैकी दुपारी काही मुले पोहोण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली. शिक्षकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. दीडच्या सुमारास यातील पाच विद्यार्थी समुद्रात ओढले गेले. या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी एक स्थानिक तरुण समुद्रात गेला, मात्र तो देखील बुडाला. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने सहा जणांपैकी दोन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तर चार जणांचा मृत्यू झाला. ओम विसपुते, दीपक वडाकाते आणि कृष्णा शेलार अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असून ते तिघेही नाशिकचे आहेत. तर केळवे येथील अथर्व नागरेचा मृत्यू ओढवला  आहे.

RELATED ARTICLES

Most Popular