24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriमहामार्ग ठेकेदाराच्या घाईमुळे पाली येथील जलवाहिनी फुटल्याने जनता त्रस्त

महामार्ग ठेकेदाराच्या घाईमुळे पाली येथील जलवाहिनी फुटल्याने जनता त्रस्त

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाली बाजारपेठेतील आधीची जलवाहिनी फुटून पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून बंद पडला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई- गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. या सुरु असलेल्या कामामुळे अनेक प्रकारचे अपघात होत आहेत. रस्त्यावरील वाहनांचे सुद्धा महामार्गावरील कामामुळे काही ठिकाणी अपघात घडत असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यामध्येच आता एक नवीन समस्या समोर आली आहे.

जिल्ह्यातील पाली येथे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाली बाजारपेठेतील आधीची जलवाहिनी फुटून पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून बंद पडला आहे. पाली बाजारपेठेमध्ये जुन्या महामार्गाच्या बाजूला असणारी ग्रामपंचायतीची शासकीय पाणी योजनेची जलवाहिनी स्थलांतरण करून घेणे आवश्यक होते. परंतु ती स्थलांतरीत न केल्याने तिथेच आहे. आणि कामांतर्गत ती फुटून गेल्याने काही दिवसांपासून बाजारपेठ, नवीन वसाहत, कोल्हापूर रोड या भागातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल झाले आहेत.

पालीतील या पाणीपुरवठा जलवाहिनीच्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने वेळीच लक्ष देऊन ठेकेदाराकडून पर्यायी पाणी पुरवठा वाहिनी टाकण्याची व्यवस्था प्राधान्याने करून, मगच पुढील काम करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. तसेच दोन्ही बाजुकडील चौपदरीकरणातील बाधीत होणारी बांधकामे हटवलेली असून खासगी कंत्राटदाराने पाणी योजेनेचे जलवाहिनीचे स्थलांतरण करणे गरजेचेच आहे.

बाजारपेठेमध्ये महामार्ग चौपदरीकरणाची ठेकेदाराकडून विनाकरण घाई केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील बाजारपेठच्या दोन्ही भागात रस्त्यालगत मातीचा भराव आणून सपाटीकरण करण्याचे काम केले जात आहे. परंतु, जर जुनी जलवाहिनी स्थलांतरीत केली नाही तर ती सुरु कशी राहणार? असा सवाल जनतेतून केला जात आहे. त्यामुळे, या कामा अगोदर पाली ग्रामपंचायतची जुनी शासकीय  पाणी योजना स्थलांतरण करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. आधीच ऋतुमुळे अंगाची लाही व्हायला सुरुवार झाली आहे आणि त्यामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने जनता त्रस्त झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular