27.2 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiriदीड वर्षांपासून पणदेरीच्या तरुणाची दहशतवाद्यांना मदत

दीड वर्षांपासून पणदेरीच्या तरुणाची दहशतवाद्यांना मदत

सापडलेल्या ५०० जीबी डाटामध्ये प्रक्षोभक व्हिडिओ, ब्रेन करणारी भाषणे आणि लेखी साहित्य सापडले आहे.

पुण्यात एटीएसने अटक केलेले दहशतवादी दीड वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला असल्याचे तपासात उघड झाले आहे. तर मंडणगड-पणदेरी (जि. रत्नागिरी) येथून अटक केलेला सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७) हा दीड वर्षापासून त्या दोन दहशतवाद्यांना आर्थिक साह्य करत असल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आले आहे. त्यांच्याकडे ५०० जीबी डाटा सापडला असून, यामध्ये मोठ्या शहरातील काही स्थळांच्या गुगल इमेज आहेत, मात्र चित्रीकरणासाठी वापरलेल्या ड्रोनचे इमेज अद्याप हाती लागलेला नाही. ड्रोनचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप प्रलंबित आहे, तर दुसरीकडे आतापर्यंतच्या तपासात दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राजकीय नेता किंवा आगामी सण, उत्सव नसल्याचे पुढे आले आहे.

मात्र त्यांचा उद्देश आणि टार्गेट समजण्यासाठी आणखी काही काळ तपास करावा लागणार आहे. कोथरूड पोलिसांनी वाहनचोरी करताना महम्मद इम्रान मोहंमद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि मोहंमद युनूस मोहमद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. मध्य प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या तपासात दोघेही एनआयने वाँटेड जाहीर केलेले दहशतवादी निघाले. आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी कोंढव्यात राहणाऱ्या मेकॅनिकल, इंजिनिअर सिमाब नसरुदीन काझी (२७, रा. कौसर बाग, मुळ पणदेरी, मंडणगड) याला रत्नागिरी येथून अटक केली होती.

तपासादरम्यान त्याच्याकडे सापडलेले साहित्य आणि केमिकल हे बॉम्ब बनविण्यासाठीच होते. त्याची चाचणी कोल्हापूर, सातारा आणि पुण्यातील जंगलात झाल्याची माहिती बरोबर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडे मुंबईतील छाबड़ हाऊसचे छायाचित्र सापडले म्हणून ते टार्गेट होते का याचा तपास सुरु आहे. सापडलेल्या ५०० जीबी डाटामध्ये प्रक्षोभक व्हिडिओ, ब्रेन करणारी भाषणे आणि लेखी साहित्य सापडले आहे.

ग्राफिक्स डिझायनर फक्त नावालाच – खान आणि साकी स्वतः ग्राफिक्स डिझायनरचे काम करत असल्याचे सांगत आहेत, तरी ते प्रत्यक्षात दहशतवादी कारवायांसाठीच पुण्यात दाखल झाले होते. त्यांना आश्रय देणान्या पठाणचाही ग्राफिक्स डिझायनिंगचा व्यवसाय नसून ते त्याआडून दोघांनाही मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्वतःच्या बचावासाठी तिघांनीही ग्राफिक डिझायनिंग व्यवसायाचा आसरा घेतला.

राज्यभर भ्रमंती – खान आणि साकी यांनी राज्यातील अनेक शहरांना भेटी दिल्या आहेत. तेथे ते एकेकदाच गेले आहेत. मात्र, तेथे गेल्यावर त्यांनी राहण्यासाठी कोणते हॉटेल बुक केले नाही. ते जाताना सोबत टेट घेऊन जात होते. हा टेट जंगलात किंवा आडबाजूला लावून ते मुक्काम करत होते.

RELATED ARTICLES

Most Popular