गणेशोत्सवात कोकणात येजा करणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा मोठा सामना सहन करावा लागतो. कोकण वासियांची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता या पार्श्वभूम ीवर मध्य रेल्वेने कोकणवासीयांसाठी चिपळूण आणि पनवेल दरम्यान तीन दिवस अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या बहुसंख्य स्थानकावर थांबणार असल्याने त्यामुळे आता गौरी गणपती विसर्जन व सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाकरता गणेश भक्तांना या गाड्याचा फायदा होणार आहे. चिपळूणच्या पुढे रत्नागिरी व व सिंधुदुर्गकडे जाण्याकरता कोकण व रेल्वेने यापूर्वी ज्यादा गाड्यांची सोय केली आहे. परंतु आता पनवेल ते चिपळूण दरम्यान जादा मेमू धावणार असल्याने पनवेल चिपळूण दरम्यान प्रवास करणाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. गणपतीचे आगमन २७ऑगस्टला झालं असून अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबरला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी जाण्याकरता अथवा परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांना या गाड्यांचा उपयोग होणार आहे. या विशेष गाड्या अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे या स्थानकांवर या गाड्या थांबतील.
गाडीच्या रचनेत एकूण आठ मेमू कोच असतील. लोकम ान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी विशेष ही गाडी २८ आणि ३१ ऑगस्ट आणि ४ आणि ७ सप्टेंबरला दोन्ही मार्गांवर धावेल. ट्रेन क्रमांक ०११३१ सकाळी ८:४५ वाजता एलटीटीहून सुटेल आणि रात्री १०:२० वाजता सावंतवाडीला पोहोचेल, तर परतीची गाडी ट्रेन क्रमांक ०११३२ सावंतवाडीहून रात्री ११:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३० वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग यांसारख्या कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबतील अशी माहिती मध्य रेल्वेच्या व्यवस्थापनाने दिली आहे. या गाड्या ५, ६ आणि ‘७सप्टेंबरला धावतील. ट्रेन क्रमांक ०११६० चिपळूण पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन चिपळूणहून सकाळी ११:०५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ४:१० वाजता पनवेलला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११५९ पनवेल- चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन पनवेलहून दुपारी ४:४० वाजता , सुटेल.