27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeChiplunपरशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली - ग्रामस्थ भयभीत

परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली – ग्रामस्थ भयभीत

सलग पडणाऱ्या पावसामुळे परशुराम घाटातील एक डोंगराची बाजू माती आणि दगडासह थेट खाली आली. सुदैवाने वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर माती आणि दगड आले नाहीत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू होती. परंतु परशुराम गावाकडील हा डोंगर हळूहळू खाली येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ठेकेदार कंपनीने दरडीची माती व दगड बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अत्यंत महत्वाचा घाट असलेल्या परशुराम घाटात पावसाळ्यात दरड कोसळणे हे नेहमीचे समीकरण राहिले आहे. दरडीची माती आणि दगड थेट महामार्गावर येऊन येथील वाहतूक ठप्प पडण्याचे व पर्यायाने महामार्गावरील वाहतूक बंद पडण्याचे प्रकार सातत्याने घडत होते.

तसेच घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावाला या दरडीचा सतत फटका बसत होता. दरडीमुळे माणसे दगावल्याची व घरांचे नुकसान झाल्याचे उदाहरणे देखील आहेत. तर घाट माथ्यावर असलेल्या परशुराम गावाला देखील दरडीचा धोका भेडसावत असतो. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होताच दरड खाली येण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे घाटात संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पेढे गावाला संरक्षण म्हणून येथे भली मोठी संरक्षण भिंत उभारण्यात आली. व त्याच बाजूने चौपदरीकरणाचा एकेरी मार्ग देखील पूर्ण करण्यात आला. त्या रस्त्यावरूनचं सध्या वाहतूक सुरू आहे. परंतु दुसऱ्या बाजुचा डोंगर मात्र नेहमीप्रमाणे धोक्याची घंटा देत आहे डोंगराची माती आणि दगड सातत्याने खाली सरकत आहेत. त्यामुळे दरडीचा धोका येथे कायम राहिला आहे.

चिपळुणात गुरुवार पासून मुसळधार पाऊस पडत आहे. सलग पडणाऱ्या या पावसामुळे पुन्हा एकदा परशुराम घाटात दरड खाली आली. परंतु सुदैवाने ती वाहतूक सुरू असलेल्या मार्गिकेवर आली नाही. वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर दरडीची माती दगड येऊ नये म्हणून उपाययोजना येथे करण्यात आलेली आहे. तरी देखील दरडीचे काही दगड रस्त्याच्या कडेला येऊन पडले, परंतु वाहतुकीला त्याचा अडथळा झालेला नाही. वाहतूक पूर्णपणे सुरळीत राहिली आहे.

दरड कोसळल्याचे समजताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली व ठेकेदार कंपनीला तात्काळ सूचना देऊन माती व दगड बाजूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ये कामाला सुरुवात करण्यात आल आहे. दरडीचा परिणाम वाहतुकीवर झाला नसला तरी परशुराम गावातील ग्रामस्थ मात्र भयभीत झाले आहेत.हळूहळू डोंगरच खाली येत असल्याने येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. आता पावसाची सुरुवात झाली असतानाच ही परिस्थिती असेल तर अजून भरपूर पाऊस पडणार आहे… त्यावेळी कोणती परिस्थिती निर्माण होईल? असा चिंतातुर प्रश्न येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular