21.6 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeChiplunपोलीस बंदोबस्तात, परशुराम घाटातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ

पोलीस बंदोबस्तात, परशुराम घाटातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ

मे अखेरपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण व्हावे यादृष्टीने कंत्राटदार कंपनी आणि महामार्ग विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला पण वाह्तुकीला अडथळे ठरतील अशी लहान सहन दुकाने, ठेले उभारण्यात आले आहेत. त्यातील काही अनधिकृत रित्या बांधण्यात आले होते. त्यामुळे ते हटवण्याचे काम चिपळूण पेढेमध्ये हाती घेण्यात आले आहे. अनेकांची बऱ्याच वर्षापासून असलेली दुकाने देखील यामध्ये हटवण्यात येणार असल्याने, काही कारणास्तव गडबड गोंधळ मजू नये यासाठी, पोलीस देखील तैनात करण्यात आले होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याची मोहीम महामार्ग तसेच कंत्राटदार कंपनीकडून हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार गुरुवारी पोलिस बंदोबस्तात पेढेतील अतिक्रमणे हटवत रस्ता मोकळा करण्यात आला. शुक्रवारपासून ता.१८ पेढेच्या पुढे कापसाळपर्यंतची अतिक्रमणे हवटण्यात येणार आहेत.

परशुराम ते खेरशेत या ३५ किमी अंतराच्या चिपळूण टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहेत. असे असतानाच आता मे अखेरपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण व्हावे यादृष्टीने कंत्राटदार कंपनी आणि महामार्ग विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर कामाला गती येण्यासाठी परशुराम घाटातील पेढे ते कापसाळ दरम्यानचा सुमारे दहा किमी मार्गावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेली अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरू करण्यात आली.

या अतिक्रमणाला हटवताना काहीही गैरप्रकार घडू नये यासाठी सुमारे ४० पोलीसांचा फौजफाटा बंदोबस्तात ठेवत सकाळपासून पेढे येथील अतिक्रमणे हटवण्यात आली. ग्रामस्थांसह व्यावसायिकांनीही सहकार्य केल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्याचे काही टप्प्यातील काम लवकरात लवकर पूर्ण झाले.

RELATED ARTICLES

Most Popular