22.5 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeChiplunचिपळूणात वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स प्रकल्पाचा श्रीगणेशा

चिपळूणात वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स प्रकल्पाचा श्रीगणेशा

हा प्रकल्प लवकरच कोकणवासीयांच्या सेवेत रुजू होणार असून पहिल्या टप्प्यात दूध पिशवी देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मे. वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स प्रा.लि. या दुग्ध प्रकल्पाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. प्रकल्प पूर्णत्वास गेला असून हा प्रकल्प आता ग्राहकांच्या सेवेत लवकरच रुजू होत असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव व संचालिका सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.

हा प्रकल्प लवकरच कोकणवासीयांच्या सेवेत रुजू होणार असून पहिल्या टप्प्यात दूध पिशवी देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. वाशिष्टी दूध ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, असा आमचा विश्वास आहे. तर नंतर टप्प्या-टप्प्याने दुग्धजन्य पदार्थ उत्पादने घेतली जाणार आहेत, असे त्यांनी शेवटी सांगितले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक समृद्धी येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना जे जे सहकार्य लागेल ते आम्ही करू, अशी ग्वाही यादव दाम्पत्याने दिली आहे.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठा पल्ला गाठला आहे. या कालखंडात गरजूंना सुलभ पध्दतीने कर्ज पुरवठा करताना सुशिक्षित तरुणांना व्यवसायासाठी देखील वेळेत कर्ज पुरवठा करून स्वावलंबी बनविण्यात मोठा हातभार लावला आहे. मात्र, येथील शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, ही भूमिका नेहमीच स्पष्ट केली होती.

यानुसार आम्ही दुध प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच पिंपळीखुर्द येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सची मुहूर्तमेढ रोवली. दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्याचा संकल्प सोडला.  इतकेच नव्हे तर अतिशय दर्जेदार आणि कोणतीही तडजोड न करता तयार होणारे दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांचा विश्वास नक्की सार्थ ठरवतील, असा आम्हाला विश्वास आहे.

हा प्रकल्प पूर्णत्वास जात या प्रकल्पाची इमारत उभी राहत असतांना शेतकऱ्यांकडून दुध संकलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. यानुसार मालघर, पिंपळीखुर्द ता. चिपळूण आंबडस, चिंचघर दस्तुरी ता. खेड या ठिकाणी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या संकलन केंद्रातून दररोज १० हजार लिटर दुध मिळत आहे. यावरून शेतकऱ्यांना दूध प्रकल्पाची किती गरज होती? हे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular