32.6 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeRatnagiriवैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे होणार समायोजन

वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे होणार समायोजन

हा निर्णय केवळ २०२२-२३ मध्ये संचमान्यतेने अतिरिक्त ठरलेल्या वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशतः अनुदानित शिक्षकांना लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे

राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशत: अनुदानित शाळामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांचे पद कमी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येते. अशा सेवा समाप्त होणार्‍या शिक्षकांची सद्यस्थिती असलेल्या नियमानुसार समायोजन करण्यात येत नाही. त्यामुळे राज्यातील वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशतः अनुदानित शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना यांच्याकडून वारंवार करण्यात येत होती.

राज्यातील वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे आता समान टप्प्यावरील रिक्त पदावर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतची कार्यपद्धती शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित करण्यात आली असून, हा निर्णय केवळ २०२२-२३ मध्ये संचमान्यतेने अतिरिक्त ठरलेल्या वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशतः अनुदानित शिक्षकांना लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशतः अनुदानित शिक्षकांना पुन्हा सेवेची संधी देण्यासाठी समान टप्प्यावरील अंशतः अनुदानित रिक्त पदावर समायोजन करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणार्‍या वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशतः अनुदानित शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षण आयुक्तांच्या स्तरावर राज्यातील रिक्त असलेल्या अंशत: अनुदानित पदांचा आढावा घ्यावा. त्यानंतर राज्यात अंशतः अनुदानित पदे रिक्त राहात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पदांची यादी तयार करून त्या रिक्त पदांवर पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणार्‍या शिक्षकांचे समायोजन सेवा ज्येष्ठतेनुसार आणि बिंदूनामावली, विषय आदी सर्वसाधारण नियमांचे पालन करून करावे. वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशतः अनुदानित कर्मचार्‍यांचे प्रथम संस्थेंतर्गत समान अनुदान टप्यावरील रिक्त पद उपलब्ध असल्यास समायोजन करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे.

RELATED ARTICLES

Most Popular