32.3 C
Ratnagiri
Wednesday, December 4, 2024

चिपळूण कापसाळ महामार्गावर गव्यांचा मुक्त संचार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराजवळील कापसाळ येथे...

हापूसचा हंगाम दीड महिन्यानी लांबला…

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण निर्माण...
HomeRatnagiriपॅसेंजर गाडी होणार सुरु, संगमेश्वर कडवई रेल्वेस्थानकावर पहिल्यांदा थांबणार- रेल्वे प्रशासन

पॅसेंजर गाडी होणार सुरु, संगमेश्वर कडवई रेल्वेस्थानकावर पहिल्यांदा थांबणार- रेल्वे प्रशासन

संगमेश्वर कडवई रेल्वेस्थानक येथे प्लॅटफॉर्म व्हावा आणि तुतारी एक्सप्रेसला या स्टेशनला थांबा मिळावा अशी ग्रामस्थांनी विनंती केली होती.

कोकणात सर्वसामान्यांना परवडणारी आणि रोजच्या प्रवासासाठी आर्थिक रित्या खिशाला परवडणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या कोरोना काळापासून गर्दी जास्त होत असल्याने बंद ठेवण्यात आली असल्याने सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे आणि सुपरफास्ट एक्सप्रेसच्या नावाखाली जादा रकमेचे तिकीट खरेदी करून मोठा आर्थिक फटका बसत आहे. याबाबत विविध पक्षांनी निवेदने दिली होती. खास. विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांच्याकडे पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरु करण्यात यावा यासाठी मागणी केली होती.

खास. राऊत यांनी केलेल्या मागणीनंतर गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रत्नागिरी दिवा पॅसेंजर, रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, मडगाव-सावतंवाडी पॅसेंजर या गाड्या ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. मागील वर्षभर बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या फेस्टिव्हल स्पेशल नावाने ७ ते ३० सप्टेंबर दरम्यान सोडण्यात येणार आहेत.

संगमेश्वर कडवई रेल्वेस्थानक येथे प्लॅटफॉर्म व्हावा आणि तुतारी एक्सप्रेसला या स्टेशनला थांबा मिळावा अशी ग्रामस्थांनी विनंती केली होती. खास. विनायक राऊत चिपळूण दौऱ्यावर आले असता त्यांनी कडवई रेल्वे स्थानकला भेट दिली असता ग्रामस्थांनी सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, जि.प. माजी अध्यक्ष संतोष थेराडे,  तालुकाप्रमुख श्री संदीप सावंत, माजी सभापती श्री दिलीप सावंत आदी  ग्रामस्थ उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाच्या वतीने अखेर मंगळवार दि. ७ सप्टेंबर पासून सुरु होणारी पॅसेंजर गाडी, संगमेश्वर कडवई रेल्वेस्थानकावर पहिल्यांदा थांबणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने येथील जन सामान्यांतून खुशी व्यक्त केली जात आहे. यामुळे ऐन गणपतीच्या काळामध्ये सामान्य जनतेला आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळाला आहे .

RELATED ARTICLES

Most Popular