21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeChiplunकळंबणीतील उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे

कळंबणीतील उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे

रुग्णवाहिकांमध्ये डिझेल नसल्याचेही काही वेळा रुग्णांना सांगितले जाते.

तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयच आजारी पडल्याचे चित्र आहे. रिक्त पदांमुळे येथील रुग्ण्याचे हाल होत आहेत, असा आरोप भाजप नेते व बोरघरचे माजी सरपंच उदय बोरकर यांनी केला. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. नुकतेच नवीन जिल्हा शल्य 15 चिकित्सक हजर झाले आहेत. परंतु, उपसंचालक आरोग्यसेवा मंडळ कोल्हापूर यांच्याकडून बॉन्ड केले जाऊन जिल्हा रुग्णालयाला तात्पुरत्या ११ महिन्यांच्या बॉन्डवर काम करणारे डॉक्टर उपलब्ध करून दिले जातात. त्यातून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाला ६ ते ७ डॉक्टरांची बॅच पुरवली जाते ती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

एनआरएचएमच्या ४ सिस्टरसह २० ते २५ सिस्टर कार्यरत आहेत. तज्ञ व सर्जन म्हणून खेडमधील खासगी रुग्णालयामधील डॉक्टर आठवड्यातून दोन ते तीन दिवस येऊन उपजिल्हा रुग्णालयात मदत करत आहेत. कार्यालयामध्ये लिपिक नाही. दापोली रुग्णालयातील क्लार्क आठवड्यातून काही दिवस येऊन येथे काम करत आहेत. कार्यरत असलेले डॉक्टर मुख्यालयात राहताना दिसत नाहीत. ओपीडीची वेळ सकाळी ८.३० ची असूनही उशिरा चालू केली जाते. गरोदर महिलांना प्रसूतीसाठी बाहेर खासगी हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णवाहिका असूनही रुग्णांसाठी त्या वापरल्या जात नाहीत. १०२ च्या दोन नवीन रुग्णवाहिका असूनही त्यासाठी आवश्यक चालक नाहीत. त्या निकामी होत आहेत.

रुग्णवाहिकांमध्ये डिझेल नसल्याचेही काही वेळा रुग्णांना सांगितले जाते. मॅनेजमेंटच्या ढिसाळ कारभारामुळे हजर झालेले दोन चालक निघून गेले, अशीही माहिती मिळत आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालय मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने अपघातग्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होत असतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाला आपला जीव गमावण्याची वेळ येते. ठेकेदारांची तिजोरी भरण्यासाठी स्रणालयासाठी मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या आहेत; परंतु आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष करून रुग्णांच्या जीवाशी खेळ का केला जातोय, याचा जाब जनतेतून विचारला जात आहे. याबाबत आरोग्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करणार असून जिल्हा प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी उदय बोरकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular