पावनखिंड म्हणल्यावर सर्वसामान्यपणे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या काही ओळी आठवतात, बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाविषयी, पण केवळ काही ओळींमध्ये संपेल इतकी छोटी ही घटना नक्कीच नाही. म्हणूनच हा चित्रपट बघणं आणि तो काळ समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. १९०० हुन अधिक शो मिळालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून पावनखिंड या चित्रपटाने नाव नोंदवले आहे.
शिवजयंतीच्या एक दिवस आधी पावनखिंड हा मराठी चित्रपट रिलीज झाला आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चोखपणे बजावली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी देखील साकारलेल्या जिजाऊ तितक्याच ताकदीच्या उभ्या केलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. पावनखिंड मराठी चित्रपट सध्या चित्रपट गृहांमध्ये तुफान गर्दी खेचण्यास यशस्वी ठरत आहे. हा पावनखिंड मराठी चित्रपट सिनेमागृहामध्ये बघितल्यानंतर अनेक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव या चित्रपटाचे यश अधोरेखित करते.
पावनखिंड या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.१५ कोटींचा गल्ला या चित्रपटाने मिळवला आहे. शनिवारी शिवजयंती निमित्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहा बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावत तब्बल २.०८ कोटींचा गल्ला जमवून दिला आहे. काल रविवारी २.८० कोटी इतकी कमाई केलेली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसातच पावनखिंड चित्रपटाने ६.०३ करोडोंचा गल्ला जमा केला आहे.
हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण इत्यादी कलाकारांनी अतोनात मेहनत केली आहे आणि प्रेक्षकांकडून मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता, या चित्रपटाची महती लक्षात येतेच. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सर्व कलाकारांना सचोटीने एकत्र बांधून ठेवून त्यांच्याकडून अतिशय उत्तम अभिनय करून घेतला आहे.