27.6 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiri२४ तासांत थकीत वेतन अदा करण्याचे सूचना – जिल्हाधिकारी रत्नागिरी

२४ तासांत थकीत वेतन अदा करण्याचे सूचना – जिल्हाधिकारी रत्नागिरी

कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता, ६२ परिचारिका कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी रुजू झाल्या. त्यांना रुजू करताना मानधन तत्वावर करण्यात आले होते. परंतु, गेले २ महिने त्यांचे वेतन देण्यात आलेले नसल्याने गुरुवारपासून त्यांनी आपले काम बंद केले होते. अनेक राजकीय पक्षांनी देखील त्यांच्या वेतनासाठी निवेदन दिली होती. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर आर्थिक रित्या परवडत नसल्याने त्या ६२ परिचारिकांनी आपले कोरोना विभागात सेवा देण्याचे काम थांबविले.

रत्नागिरीमध्ये कोरोनाची स्थिती भयानक असताना, आरोग्य यंत्रणेवर येणाऱ्या प्रचंड ताणामुळे या प्रशिक्षणार्थी परिचारिकांना कोरोना रुग्णालयामध्ये सेवेसाठी रुजू करून घेण्यात आले. दिवस रात्र या परिचारिकांनी रुग्ण सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. परिचारिकांनी कोरोनाच्या या महामारीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. गुरुवारी या ६२ परीचारीकांनी पगार मिळत नसल्याने कामबंद केल्याची बाब नूतन जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर गेल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी २४ तासाच्या आत त्या ६२ परीचारकांचे थकीत वेतन अदा करा आणि त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्या अशा सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, काही तांत्रिक अडचणींमुळे पगाराच्या अडचणी निर्माण आल्या असतील, मात्र आता या २४ तासात थकलेले वेतन देण्याच्या सूचना आपण आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे आता या सर्व परिचारिकांनी कामावर हजर रहावे असेही त्यांनी सांगितले. पदभार स्वीकारताच, जनतेच्या हिताचा प्रथम विचार करणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या बद्दल स्नेहाचे वातावरण जनतेमध्ये निर्माण व्हायला सुरुवात होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular