26 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriभाडेकरू ठेवताना पोलीस एनओसी आवश्यक

भाडेकरू ठेवताना पोलीस एनओसी आवश्यक

रत्नागिरी शहरामध्ये अनेक काळ गुन्हेगारी प्रवृत्तीला बसलेला आळा कुठेतरी सैल पडत असल्याचे गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून येत आहे. मागील काही दिवसामध्ये नाचणे परिसरामध्ये अनैतिक धंद्यासाठी इमारतीमधील रूमचा वापर करण्यात आल्याचा गंभीर विषय समोर आल्यापासून, रत्नागिरी पोलीसानी सर्वाना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी शहरामध्ये भरवस्तीत नाचणे रोडलगतच्या इमारतीमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर खोट गिर्हाईक पाठवून सत्यतेची खात्री पटवून तेथे छापा टाकला असता, एक पिडीत मुलगी आणि वेश्या व्यवसायामध्ये उतरवणार्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यातील एक महिला अजून फरार असून, पोलीस तिच्या मागावर आहेत. सदर प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर मालकाने भाडेकरु ठेवताना पोलिसांकडून एनओसी घेणे गरजेचे आहे. तरच अशा विकृतींना आळा बसेल, अशी चर्चा जनतेमध्ये सुरु झाली आहे.

मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये भाडेकरुन ठेवताना एनओसी घेतली जाते. अगदी घरामध्ये मदतनीस ठेवायची असेल तरी तिची/त्याची पूर्ण चौकशी करून तिची ओळख कागदपत्रे तपासून, त्याची एक झेरोक्स कॉपी सोसायटी अध्यक्षांकडे जमा करण्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे असेच नियम रत्नागिरी शहरासह इतर जिल्ह्यांमध्ये लागू केले तर जिल्ह्यातील गुन्हेगारीस नक्कीच आळा बसण्यास मदत होईल.

काही आरोपी परजिल्ह्या अथवा परराज्यामधून गुन्हे करुन रत्नागिरी शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील परिसरामध्ये पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी येऊन लपून राहतात. खोट्या माहितीच्या आधारे सुद्धा काही जण वास्तव्य करतात, यासाठी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यामध्ये भाडेकरू ठेवताना, त्या व्यक्तींच्या चारित्र्याबद्द्ल सखोल चौकशी करून, माहिती काढून आणि पोलिसांकडून एनओसी घेणे गरजेचे असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular