परशुराम घाटात दोन जुलैला शनिवारी रात्री उशिरा दरड कोसळली आणि वाहतूक बंद झाली. यापूर्वी अनेकदा परशुराम घाटातील दरड कोसळली. पेढे गावातील गावकऱ्यांमध्ये परशुराम घाटात डोंगरावरील बाजूने संरक्षक भिंती नसल्यामुळे डोंगर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती त्याला लागून असलेल्या आहे. त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवावी, अशी वारंवार मागणी पेढे ग्रामपंचायतीकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सोमवारी हे निवेदन देण्यात आले. यात मोठी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा आमच्या गावचे माळीण होईल, असे त्यांना निवेदनातून सुचवायाचे आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून परशुराम घाटातील वाहतूक ९ जुलै पर्यंत बंद करण्यात आली आहे.
डोंगराच्यावरील बाजूने संरक्षक भिंत आणि हायवेच्या खालच्या बाजूने संरक्षक भिंतीची वारंवार मागणी आणि विनवणी करूनही त्याकडे लक्षच देण्यात आलेले नाही. त्यामुळेच आज ही परिस्थिती ओढवली आहे, असा गंभीर आरोप निवेदनात शासन प्रशासनावर करण्यात आला आहे. या मार्गावरून प्रवास करताना परशुराम घाट चालू झाल्यावर प्रवाशांची भीतीने गाळण उडत आहे. कधी काय घडेल आणि होत्याच नव्हत होईल ? याचा भरवसा देता येत नाही. रात्रीच्या वेळी या घाटात प्रचंड भयानक असे वातावरण निर्माण झालेले असते.
रात्रीचा प्रवास करताना अचानक डोंगर खचल्यास प्रवासी आपला जीव कसा वाचवणार? हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच कोणतीही दुर्घटना होऊ नये वाहने. दरडी खाली येऊ नयेत आणि जीवित हानी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून परशुराम घाट अतिवृष्टीवेळी पूर्णपणे बंद ठेवण्यात यावा. रात्री ९.०० ते सकाळी ६.०० पर्यत वाहतुकीस बंद ठेवण्यात यावा. अवजड वाहनांना या मार्गाने ये-जा करण्यास बंदी करावी आणि वाहतूक आंबडस-चिरणी मार्गे लोटे, अशी चालू ठेवावी या मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशा काही मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. वारंवार कोसळत असलेल्या दरडीमुळे घाबरून पेढे परशुराम ग्रामस्थांची झोप उडाली आहे अशी व्यथा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.