26.7 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriनियम मोडणाऱ्या ५५ हजार जणांना दंड, जिल्हा वाहतूक पोलिस

नियम मोडणाऱ्या ५५ हजार जणांना दंड, जिल्हा वाहतूक पोलिस

गेल्या वर्षात वाहतूक पोलिसांनी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे महामार्गावर तसेच शहर आणि गावातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. वाहनांचे अपघात घडू नयेत यासाठी वाहतुकीचे नियम बनवलेले आहेत. हे नियम मोडणाऱ्यांना शिक्षा किंवा दंड करण्याची तरतूद आहे; मात्र काही वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडतात. त्यामुळे अपघात घडतात. दरवर्षी होणाऱ्या असंख्य अपघातात हजारो लोक जखमी होतात तर काही मृत्युमुखीही पडतात. नियम मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांमार्फत दंडाची तरतूद केली आहे. गेल्या वर्षात वाहतूक पोलिसांनी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्हा वाहतूक शाखेकडून विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट गाडी चालवताना, मोबाईलवर संभाषण, मालवाहतुकीच्या वाहनातून प्रवासी वाहतूक, रेड सिग्नल जंपिग, विनाविमा, विनापरवाना, फॅन्सी नंबर प्लेल्ट, धोकादायकपणे वाहन चालवणे, नो-पार्किंग, चुकीचे पार्किंग, डार्क ग्लास, रहदारीला अडथळा, नो-एंट्री, ट्रीपल सीट, क्लॅडस्टाइन ऑपरेशन, दारू पिऊन गाडी चालवणे आदी गुन्हा करणाऱ्या ५५ हजार ३०९ चालकांना दंड केला आहे. येथून पुढे कारवाईची मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचे वाहतूक पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular