22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeIndiaपाकच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या ३ काश्मिरी विद्यार्थ्यांना कोर्टात हजेरी लावताना मारली...

पाकच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या ३ काश्मिरी विद्यार्थ्यांना कोर्टात हजेरी लावताना मारली कानशिलात

टी-20 विश्वचषकात भारताचा पराभव आणि पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या आणि पाकिस्तान समर्थक घोषणाबाजी करणाऱ्या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान काही लोकांनी पोलिस कोठडीत असलेल्या त्या विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांच्या कानशिलात लगावले. या तीन काश्मिरींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आग्रा येथील आरबीएस कॉलेजच्या बिचपुरी कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी तिन्ही काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरावे मिळाल्यानंतर खटल्यात देशद्रोहाचे कलम १२४ अ वाढवण्यात आले आहे. गुरुवारी या तिन्ही विद्यार्थ्यांना सीजेएम न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले. न्यायालयात हजर झाल्यानंतर पोलीस तिन्ही विद्यार्थ्यांना घेऊन बाहेर येताच तेथे उपस्थित काही लोकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

त्यानंतर भारत मातेचा जयघोष करत असताना जमावात सामील असलेल्या लोकांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना चोप दिला. हा सर्व प्रकार पाहून पोलिसांनी तत्परता दाखवत इनायत अल्ताफ शेख, अर्शद युसूफ आणि शौकत अहमद गनी या विद्यार्थ्यांना तत्काळ पोलिस जीपमधून कारागृहात नेले. गोंधळ घालणारे लोकही पोलिसांच्या जीपच्या मागे धावले.

या प्रकरणाची माहिती देताना जिल्हा सरकारी अधिवक्ता म्हणाले की, जगदीशपुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ६६ एफ १२४अ, १५३अ, ५०५, १बी माहिती तंत्रज्ञान सुधारणा कायदा २००८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांचे मत आहे. तीन आरोपी विद्यार्थ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular