25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeKhedसर्व जाती, धर्माचे लोकं माझ्या सोबत असल्याने निवडून येईनच! आ. भास्करशेठ जाधव

सर्व जाती, धर्माचे लोकं माझ्या सोबत असल्याने निवडून येईनच! आ. भास्करशेठ जाधव

विरोधकांकडे कोणतेच व्हिजन नाही अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.

कुणबी समाजच नव्हे तर या मतदारसंघातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्या पाठिशी उभे आहेत. त्यामुळे जातीच्या नावावर सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. समाजबांधव जागृत आहेत. त्यामुळे समाजाच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांना येत्या निवडणुकीत माझ्या मतदारसंघातील जनता निश्चित जागा दाखवेल असे सांगतानाच किमान ५० हजारांच्या मताधिक्यांनी मी विजयी होईन असा विश्वास गुहागरचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भास्करशेठ जाधव यांनी व्यक्त केला. माजी पालकमंत्री आणि गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी पत्रकारांशी आपल्या भावना व्यक्त केल्या. विरोधकांच्या टीकेचा त्यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला.

मताधिक्य किती यासाठीच प्रचार – आमदार भास्कर जाधव म्हणाले की, ‘मी विदर्भ दौरा करून आलो आहे. मतदारसंघात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचार करीत आहेत एकजीव होऊन सारे प्रचारात उतरले आहेत. सोबत विक्रांत जाधव आहे. माझा मुलगा म्हणून सांगत नाही तर विक्रांत सर्वत्र फिरत आहे. तो तरुण असल्याने शेकडो तरुण त्याच्यासोबत काम करीत असून माझा प्रचार हा निवडून येण्यासाठी नाही तर तो मताधिक्य किती मिळते यासाठी आहे. म्हणून मी सांगतो किमान पन्नास हजारच्या पुढे आपण निवडून येणार आहोत’

त्याची विकासाची व्याख्या काय ? – खरे तर सर्वांगीण विकास म्हणजे काय? रस्ते, पाखड्या, साकव, शाळा, इमारती केल्या म्हणजे विकास झाला असे जर विरोधक म्हणत असतील तर त्यांची विकासाची व्याख्या तरी काय आहे? विकासाचे व्हिजन ते कधी समोर आणत नाहीत. मी माझ्या अहवालात माझे व्हिजन ‘मांडले आहे. केलेली सर्वांगीण विकासकामे मांडली आहेत. विरोधकांकडे कोणतेच व्हिजन नाही अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.

मी लेखी पुरावाच दिला आहे – आपण पर्यटन, क्रीडाक्षेत्रात आणि बेरोजगारी संदर्भात काय काय केले हैं आपल्या अहवालात नमूद केले आहे. वेगवेगळ्या समाजासाठी काय काय केले आहे हे ही नमूद केले आहे. ते काय म्हणतात या पेक्षा मी काय केले याचे पुरावा आपणासमोर अहवालाच्या आधारे ठेवला आहे. आपण बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. रोजगार मेळावा घेतला आहे. मोठं मोठ्या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. काहींना कंपनीकडूनच प्रशिक्षण देऊन त्याच कंपनीत जॉब दिला. पर्यटनाच्या माध्यमातून निवास न्याहारीची व्यवस्था केली आहे. तरीसुद्धा जर विरोधक असे बोलत असतील तर जनता सुज्ञ आहे असे आमदार जाधव म्हणाले.

मच्छिमारांसाठी बोर्ड स्थापन – निवडणुकीत आरोप होत असतात. पण आरोप करताना त्यात वस्तुस्थिती काय आहे हे जनता ओळखते. आरोप करणे एवढेच त्यांचे काम आहे. आपण मच्छीमार समाजासाठी माथाडी कामगार धर्तीवर बोर्ड स्थापन केले त्यातून अनेकांना फायदा झाला. लोटे एमआयडीसीमध्ये नवं नवीन कारखाने यावे यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत असे आमदार जाधव यांनी सांगितले.

मतदार सूज्ञ आहे – दुर्लक्षित असलेला हा मतदार संघ होता. आता राज्याच्या दिग्गज नेत्यांनां लक्ष घालावे लागत आहे. मला पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य माणसातून तयार झालेले माझ्यासारखे नेतृत्व आहे. आता हे नेतृत्व ठिकवणे ही जबादारी सर्वसाम ान्य जनतेची आहे, ती जबादारी जनता घेईल कारण गुहागरमधील जनतेला सदसदविवेकबुद्धी आहे याचा विश्वास मला असल्याचे आ जाधव यांनी स्पष्ट केले. कितीही दिगग्ज नेते आले तरी निवडून हा मीच येणार असा विश्वास ही त्यानी व्यक्त केला.

ती तर मते पूर्वीच वळाली आहेत – खर तर २०१९ला सेना-भाजप युती होती, मात्र भाजपच्या लोकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केले. भाजपची मते या वेळेपासून राष्ट्रवादीकडे वळली आहेत. आज जरी त्याची युती असली तरी ती मते मलाच मिळतील. ही ५ वर्षातील राजकीय कटुता सोडली तर भाजपा कार्यकर्ते आणि आम्ही एकत्रच काम केले आहे असे आमदार जाधव यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular