24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRatnagiriरत्नागिरीतील पाईपलाईन पुन्हा फुटली

रत्नागिरीतील पाईपलाईन पुन्हा फुटली

दोन दिवसांमध्ये सलग दोनवेळा ही पाइप शहरात फुटली.

शहरासाठीच्या सुधारित नवीन नळपाणी योजनेच्या दर्जाहीन कामाची पुन्हा पुन्हा प्रचिती येत आहे. दोन दिवसांमध्ये सलग दोनवेळा ही पाइप शहरात फुटली. शुक्रवारी (ता. २२) बसस्थानकासमोरची दुरुस्ती झाली होती, शनिवारी शासकीय रुग्णालयाजवळ पुन्हा पाइपलाइन फुटली. गेल्या पंधरा दिवसांमध्ये जिल्हा रुग्णालय ते रामआळीदरम्यान पाचवेळा मुख्य पाइपलाइन फुटली. त्यामुळे नव्या योजनेच्या दुरुस्तीवर पालिकेला अधिक खर्च करावा लागत आहे. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत जेलनाका ते रामआळीपर्यंतची पाइपलाइन वारंवार फुटत आहे. नवीन योजना असून देखील ही परिस्थिती आहे. गेल्या पंधरा दिवसांचा विचार केला तर ती पाचवेळा फुटली आहे.

शुक्रवारी बसस्थानकासमोर पाइप फुटला होता. रस्ता खोदून त्याची दुरुस्ती करण्यात आली; परंतु यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. नागरिक या समस्येतून सुटले तोवर शनिवारी सकाळी पुन्हा शासकीय रुग्णालयासमोर पुन्हा पाइप फुटला. दुरुस्त करून कर्मचारी हैराण झाले आहेत. ज्या ठिकाणी जोडली आहे त्या ठिकाणी ती पुन्हा पुन्हा फुटत आहे. यामुळे शहरातील पाणीवितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

योजना सुरुवातीपासूनच वादात – रत्नागिरी शहराच्या विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी सुधारित नवीन नळपाणी योजना मंजूर झाली. योजनेचे काम सुरू झाल्यापासून वादातीत ठरली. योजनेचे काम सुरू झाल्यापासून कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी झाल्या; परंतु तरी हे काम रेटून नेण्यात आले; मात्र आज त्याचे परिणाम दिसत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular