23.4 C
Ratnagiri
Sunday, February 1, 2026

चिपळूणात काँग्रेससह उबाठा, राष्ट्रवादीला जोर का झटका

भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास...

मिऱ्या- नागपूर महामार्गाची ‘डेडलाईन’ हुकणार? मे अखेर काम पूर्ण होणे कठीण!

विदर्भ आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या नव्या पाणी योजनेत मांडवीतील पाईपलाईन खराब, ठेकेदाराचा दुरुस्तीला नकार

रत्नागिरीच्या नव्या पाणी योजनेत मांडवीतील पाईपलाईन खराब, ठेकेदाराचा दुरुस्तीला नकार

२० किमीची पाईप खराब दर्जाहीन असल्याचे स्पष्ट केले आहे.

शहरातील सुधारित नळ पाणी योजनेच्या दर्जाकडे बोट दाखविणारी गंभीरबाब पुढे आली आहे. जिल्हा परिषद साठवण टाकी ते मांडवी परिसरातील २ किमी नवीन मुख्य पाईपलाईन खराब असल्याचा अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिला आहे. वारंवार ही पाईपलाईन फुटत असून योजनेच्या देखभालीसाठी ठेकेदाराने नकार दिल्यामुळे देखभाल दुरूस्तीसाठी ४ लाख ५४ हजार रुपये ठेकेदाराचे पालिकेने राखून ठेवले आहेत. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन ठेकेदाराची २७ लाख ६४ हजार अनामत रक्कम पालिकेने राखुन ठेवली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही अधिकृत माहिती दिली. रत्नागिरी शहरासाठी सुधारित पाणी योजना मंजूर झाल्यापासून वादातच आहे. जुन्या पाणी योजनेचे पाईप गंजलेले, दबलेले, तुंबल्यामुळे शहरातील पाणी व्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते. शीळ धरणात मुबलत पाणी असूनही शहरवासीयाची तहान भागत नव्हती. त्यामुळे उन्हाळ्यात शहरात पाण्याबाबत प्रचंड ओरड होत होती. शहराला ५६ कोटी ६० लाखाची सुधारित पाणी योजना मंजूर झाली आणि शहरवासीयांनी निश्वास सोडला. परंतु पाणी योजनेचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत योजना काम चर्चेत राहिली.

दौन वर्षांमध्ये हे काम पुर्ण करायचे होते. परंतु कोरोनामुळे हे काम रखडले. त्यानंतर ठेकेदाराने वाढीव दरावरून वाढीव रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणः ही कन्सल्टन एजन्सी होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते. रडतखत पाणी योजनेचे काम झाले. योजना पालिकेकडे वर्ग करण्यात आली. याबाबत पालिकेने एक महिना योजनेची देखभाल दुरूस्ती करावी, अशी मागणी ठेकेदाकडे केली होती. परंतु ठेकेदाराने ही जबाबदारी घेण्यास नकार दिला. शहरातील जिल्हा परिषद ते मांडवी अशी मुख्य जलवाहीनी अजूनही वारंवार फुटत आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपला अहवाल पालिकेला दिला असून २० किमीची पाईप खराब दर्जाहीन असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नव्या योजनेतही पालिकेची फसगत झाल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत पालिकेने देखभाल दुरूस्तीसाठी ठेकेदाराचे ४ लाख ५४ हजार रुपये पालिकेने राखून ठेवले आहेत. परंतु पाईपलाईन फुटण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. त्याचा फ कटचा मनस्ताप आता पालिकेला सहन करावा लागत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular