26.6 C
Ratnagiri
Sunday, February 1, 2026

आंगणेवाडीत जत्रोत्सवाची लगबग उत्सव ९ फेब्रुवारीला

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि दक्षिण कोकणचे 'प्रती...

महानगर कंपनी’वर कारवाईचे संकेत…

महानगर गॅस कंपनीने शहरात केलेल्या खोदकामाचा मुद्दा...

रत्नागिरी न.प.च्या पहिल्याच सभेत सत्ताधारी नगरसेवक आक्रमक

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच...
HomeMaharashtraअजितदादांच्या विमानाला झालेला अपघात पायलटच्या चुकीमुळे झाल्याचा कयास?

अजितदादांच्या विमानाला झालेला अपघात पायलटच्या चुकीमुळे झाल्याचा कयास?

तांत्रिक मर्यादा लक्षात न घेता लँडींग करण्याचा चुकीचा प्रयत्न झाल्याने हा अपघात झाला असावा

ना. अजितदादा पवार यांना बारामतीला घेऊन येणाऱ्या विमानाला बुधवारी सकाळी अपघात झाला आणि त्यामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू ओढवला. हा अपघात नेमका कसा आणि कोणत्या कारणाने झाला याची उच्चस्तरीय पातळीवर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान कमी दृश्यमानता असताना हे विमान लँडींग करण्याचा प्रयत्न झाला आणि वैमानिकाच्या चुकीमुळे विमान कोसळले असा संशय प्राथमिक चौकशीच्या आधारावर व्यक्त होत आहे. बारामती विमानतळावरील तांत्रिक मर्यादा लक्षात न घेता लँडींग करण्याचा चुकीचा प्रयत्न झाल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक कयास वर्तविण्यात येतो आहे. दरम्यान या अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय कालबद्ध चौकशी करण्याचे आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. चौकशी सुरू झाली असल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.

लँडींगचा प्रयत्न अयशस्वी – सकाळी ८.४० वा.च्या सुमारास हे विमान बारामतीमध्ये दाखल झाले. धुक्यामुळे कमी दृश्यमानता होती. असे असतानाही लँडींगचा प्रयत्न करण्यात आला. पहिला प्रयत्न असफल ठरला. त्यानंतर दुसरा प्रयत्न झाला. त्यावेळी दृश्यमानतेबाबतचा पायलटचा अंदाज चुकला आणि न दिसल्यामुळेच विमान धावपट्टीवर लैंड न होता काही अंतर पुढे जावून आकाशात गिरकी घेत कोसळले, असे प्राथमिक तपासात दिसते आहे. विमानतळ वाहतूक प्राधिकरणाने हा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

विमान वळविता आले असते – कमी दृश्यमानतेमुळे लँडींग होत नव्हते हे लक्षात येताच वैमानिकाला ते विमान पुण्याच्या दिशेने वळविता आले असते मात्र त्याने बारामतीत उतरविण्याचा निर्णय घेतला. लँडींगसाठी दुसरा प्रयत्न केला तो व्यवस्थित झाला नाही. विमानाचा वेग आणि स्थितीमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला असा प्राथमिक अंदाज आहे. सुरुवातीच्या तपासानुसार व्हीआयपी विमाने आणि हेलिकॉप्टरच्या ऑपरेशनदरम्यान वेळेवर उतरण्याचा एक दबाव वैमानिकावर असतो. काही मिनिटांपूर्वी धावपट्टी स्पष्ट दिसत नसताना अनियंत्रीत एअरफिल्डकडे असा दृष्टीकोन घेणे धोकादायक मानले जाते.

चौकशी सुरू – अपघात नेमका कशामुळे झाला? काय चूक झाली? हे शोधण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून सरेखन विमानाची धावपट्टी आणि अंतर याची कसून चौकशी केली जात आहे. घटनाक्रम तपासून पाहिला जात आहे: अजित पवार ज्या व्हिएसआर व्हेंचअर्सच्या लिअरजेट-४५ या विम ानाने मुंबईतून निघाले त्यावेळी विम ानाची स्थिती काय होती याचीदेखील चौकशी आणि पहाणी केली जाणार आहे. सकाळी ८.१० वा. ते मुंबईतून निघाले. त्यांना बारामतीत यायचे होते. अपेक्षेप्रमाणे अर्धातासात म्हणजे सकाळी ८.४० वा. ते बारामतीला पोहोचले देखील मात्र त्यानंतर लँडींग न झाल्याने वेळ गेला आणि पुढील पाच-सहा मिनिटात विमान कोसळले. स्फोट झाला, आग लागली आणि त्यामध्ये अजितदादांसह पाचजणांचा मृत्यू ओढवला. या सर्व घटनाक्रमाचा तपास होतो आहे. काढण्यात आलेला निष्कर्ष हा प्राथमिक आहे. त्यामुळे तोच खराच असेल असा दावा विम नितळ प्राधिकरणाने केलेला नाही.

बारामती विमानतळावरील अट – दरम्यान बारामती विमानतळावर ५ कि.मी. दृश्यमानता असेल तरच विमान उतरविण्याची परवानगी आहे. असे असताना ३ कि.मी. व्हिजीब्लीटी म्हणजे दृश्यमानता असताना लँडींगचा प्रयत्न का झाला. याची देखील चौकशी होते आहे. नियंत्रण कक्षाशी जेव्हा पायलटने संपर्क साधला त्यावेळी त्याला नेमकी कोणती सूचना मिळाली हेदेखील तपासले जाणार आहे. प्राथमिक कयासानुसार बारामती विम नितळावरील तांत्रिक मर्यादा आणि लँडींगच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन विमान उतरविण्याचा प्रयत्न पायलटने केल्याने हा अपघात घडल्याचे मानले जात आहे.

दोन प्रकार – विमान वाहतुकीत लँडींगचे दोन मुख्य प्रकार असतात. पहिला ज्याला व्हीज्युअल फ्लाईट रुल्स म्हटले जाते ज्यामध्ये पायलट स्वतःच्या डोळ्यांनी धावपट्टी पाहून लँड करतो. बारामती एअरपोर्टसाठी ५ कि.मी.ची दृश्यमानता निश्चित करण्यात आली आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे आयएफआर म्हणजेच इन्स्ट्रमेंट फ्लाईट रुल्स जेथे हाय टेक उपकरणांच्या सहाय्याने दृश्यमानता कमी असताना विमान लँड केले जाते. बारामतीला झालेल्या विमान अपघातामध्ये दुसरा रुल्स वापरण्यात आला असे दिसते आहे.

RELATED ARTICLES

Most Popular