संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे विमान राजस्थानातील बाडमेर येथील चक्क राष्ट्रीय महामार्गावर उतरणार आहे. वाचून आश्चर्य वाटण्यासारखेच आहे. विमान आणि महामार्गावर उतरणार ! परंतु, देशात केला गेलेला हा एक अनोखा प्रयोग आहे. जाणून घेऊया थोडक्यात.
हवाई वाहतुकीसाठी विमानतळांची विशेष आखणी करून बांधण्यात आलेली असतात. विमान उड्डाण आणि लॅड करण्यासाठी विशेष पद्धतीची धावपट्टी बांधण्यात आलेली असते. परंतु एखाद्या वेळी काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर, हवाई दलाच्या विमानांना इमर्जन्सी लॅण्डिंगसाठी महामार्गावरही उतरता यावे, यासाठी राष्ट्रीय महामार्गावर सुमारे साडेतीन किलोमीटर लांब धावपट्टी तयार करण्यात आली आहे.
त्यामुळे विमान केवळ धावपट्टीवरच उतरते हे आता, इतिहासजमा होण्याची शक्यता चुकीची ठरणार नाही आहे. देशाने केलेल्या अनोख्या प्रयोगाचे लवकरच प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हवाई दलाच्या मदतीने देशातील बारा राष्ट्रीय महामार्गांवर विमानांसाठीची विशेष धावपट्टी तयार केली जाणार आहे. त्यादृष्टीने पाहणी आणि अभ्यास सुरू असल्याचे समजते. आगामी काळात राष्ट्रीय महामार्गावर विमान उतरविलेले दिसले तर चकित होऊ नये, कारण हा प्रयोग प्रत्यक्षात घडून येणार आहे.
ऑक्टोबर २०१७ सालामध्ये लढावू आणि मालवाहू विमानांचे महामार्गांवर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यासंदर्भात लखनौ-आग्रा महामार्गावर प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यात आली होती. देशातील हा पहिलाच अनोखा प्रयोग असून याचे उद्घाटन ना. राजनाथ सिंग आणि ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते याच आठवड्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.