26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiriएमआयडीसीतील बळकावले गेलेले भूखंड ताब्यात घेणार, उद्योगमंत्री उदय सामंत

एमआयडीसीतील बळकावले गेलेले भूखंड ताब्यात घेणार, उद्योगमंत्री उदय सामंत

सर्वेक्षणात या क्षेत्रात २७६ भूखंडांवर काहीही उद्योग सुरू न करता त्या जागा पाडून ठेवण्यात आलेल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ३, १३३ हेक्टरच्या एमआयडीसी क्षेत्रात निष्कीय ठेवलेले भूखंड ताब्यात घेण्यासाठी उद्योग विभागाने पाउल उचलले आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात या क्षेत्रात २७६ भूखंडांवर काहीही उद्योग सुरू न करता त्या जागा पाडून ठेवण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारचे बळकावलेले भूखंड संबंधितांकडून परत घेण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे. जर त्यावेळी गैरप्रकार आढल्यास फौजदारी कारवाई करणार असल्याचा सज्जड इशारा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्राच्या विकासासाठी राज्याच्या उद्योग विभागामार्फत पाउल उचलण्यात आलेले आहे. या क्षेत्रात नवनवीन उद्योगांबरोबरच येथे आवश्यक असलेल्या सुविधांचा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकताच या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

यासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगक्षेत्राचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर रत्नागिरी एम आयडीसी कार्यालयात शुकवारी सायंकाळी मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्ह्यातील एमआयडीसीकडे एकूण ३ हजार १३३ हेक्टर क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये ४ हजार ६९ भूखंड उद्योग व्यवसायासाठी पाडण्यात आलेले आहेत. त्यापैकी २,१४० भूखंड उद्योगांसाठी, ४७८ व्यापाऱ्यांसाठी, २७६ निवासी म्हणून देण्यात आलेले आहेत. तर शिल्लक ७७३ भूखंड आहेत. या भूखंडावरील २१४६ उद्योग सुरू आहेत. अजूनही २७६ भूखंड कोणताही उद्योगधंदा सुरू न करता पाडून ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे असे भूखंड एम आयडीसी विभाग पुन्हा संबधितांकडून ताब्यात घेणार आहे.

हे भूखंड नवीन उद्योजकांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या क्षेत्रातील काही प्रमाणात भूखंड हे ताब्यात घेउन त्याचा गैरवापर केला गेला असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशा भूखंडांची योग्य ती चौकशी केली जाणार आहे. जर त्यामध्ये परस्पर विकी केल्याचे गैरप्रकार आढळून आल्यास संबधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची सक्त ताकीद उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत दाभोळ खाडी प्रदूषणाबाबत बैठक झाली. त्यावेळी दाभोळ खाडीकडे जाणाऱ्या नाल्याचे कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, नादुरूस्त पाईपलाईन दुरूस्त करणे, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी चिपळूणऐवजी लोटे एमआयडीसीमध्ये कार्यालय स्थलांतरीत करणे, प्रदुषणाबाबत भरारी पथकाची स्थापना करणे व त्यावर लक्ष ठेवणे आदी विषयांवर चर्चा झाली.

त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे जमीन आणि संग्रहालयकरता भूसंपादन करण्याचे झालेले आहे. हे भूसंपादन १ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या प्राणीसंग्रहालय उभारणीसाठी थेट खरेदीने भूसंपादन करण्याकरता ३ कोटी ९५ लाखांचा निधी तहसिलदार रत्नागिरी यांना वितरीत करण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular