22.2 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraजगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला असून देहूला अगदी छावणीचे स्वरूप आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहूमध्ये मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. आज पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार असून, त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहणार आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि पुणे येथील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. प्रथम पुण्यातील देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. त्यानंतर मुंबईतल्या तीन कार्यक्रमांना त्यांची हजेरी असेल. देहूतल्या कार्यक्रमावेळी ते वारकऱ्यांशीही संवाद साधतील. आज दुपारी १.४५ च्या सुमाराला पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील.

देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मुंबईसाठी रवाना होतील. राजभवन इथे नवीन जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा या क्रांतिकारकांच्या दालनाचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर पुन्हा एकत्र दिसणार आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत फडणवीस यांनी शिवसेनेचा एक प्रकारे गेम केला होता. त्यानंतर प्रथमच दोन्ही नेते एका मंचावर एकत्र येणार आहेत.

नरेंद्र मोदींच्या हस्ते आज रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर,  पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. साधारण दीड ते दोन तासापर्यंत सदरचा कार्यक्रम सुरू राहणार आहे.  पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला असून देहूला अगदी छावणीचे स्वरूप आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular