26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriअल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार,पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार,पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

सोशल साईटवर असलेली माहिती, ओळख , नाव, गाव खरे असेलच असे नाही.

सोशल मिडिया हा विषय जेवढा इंटरेस्टिंग आहे, तेवढाच तो धोकादायक सुद्धा आहे. सोशल मिडीयावर विविध प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार घडत असल्याच्या घटना आपण राजरोस ऐकतच असतो. तरी सुद्धा अनेकांचे अनुभव, उदाहरणे समोर असून सुद्धा अनेक तरुण तरुणी नको त्या प्रकरणात स्वत:ला अडकवून घेतात.

सोशल साईट्सवर ओळखी होतात, अनेकांची मैत्री होते, प्रेम प्रकरण जुळतात तर काही जण आधी पासूनच असल्या प्रकरणापासून चार हाथ लांब राहतात. सोशल साईटवर असलेली माहिती, ओळख , नाव, गाव खरे असेलच असे नाही. प्रथम याची खात्री करून घेऊन मगच कोणत्याही गोष्टीत पुढाकार घ्यावा. नाहीतर अशा खोट्या गोष्टी नंतर अंगलट येतात.

इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर ४ महिने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना रत्नागिरी सारख्या सुसंस्कृत शहरात घडलेली उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजीवडा येथील संशयित तरुणाला शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

उजैफ वस्ता वय २०, रा.राजीवडा रत्नागिरी असे ताब्यात घेतलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिची संशयित उजैफ वस्ता बरोबर सोशल साईट इन्स्टाग्रामवर ओळख झालेली. दोघांच्यातील ओळख वाढून, हळूहळू जवळीक वाढली. याचा फायदा घेत उजैफने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून सप्टेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि तिला शिवीगाळ व दमदाटी करून काही प्रमाणात शारीरिक इजाही पोहोचवली. याप्रकरणी पीडितेने गुरुवार ६ जानेवारी रोजी शहर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी उजैफ विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली.

RELATED ARTICLES

Most Popular