27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriपोलीस भरती अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवण्याची मागणी

पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवण्याची मागणी

पोलिस भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र पोलिस खात्यांतर्गत पोलिस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना वेबसाईट सतत हॅंग होत असल्यामुळे भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातील अनेक उमेदवार हैराण झाले आहेत. एक फॉर्म पूर्ण भरण्यासाठी किमान दोन तासाचा कालावधी लागत आहे.

जेंव्हा ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेंव्हा २० नोव्हेंबरपर्यंत सर्व्हर वेगाने काम करत होता. त्यानंतर हळूहळू वेग कमीच होत गेला. पोलिस भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सरकारने तांत्रिक बिघाड दूर करावा किंवा अर्ज करण्यासाठी आणखी पंधरा दिवसाची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शौकत मुकादम, माजी सभापती, चिपळूण यांनी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

अगदी शेवटच्या टप्प्यात अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सर्व्हरवर आधील लोड आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे;  मात्र जर वारंवार असा प्रकार घडत राहिला तर मात्र उमेदवार भरतीपासून वंचित राहू शकतात. आता अर्जाची संख्या वाढत असल्याने किंवा एजन्सीच्या चुकीमुळे पोलिस भरती प्रक्रियेसाठी वेबसाईट सतत हॅंग होणे व सर्व्हर डाऊन असण्याची तांत्रिक अडचण जाणवत आहे.

ऑनलाईन चलन भरताना सतत वेबसाईट हॅंग होत आहे. हेल्पलाइनवर संपर्क केल्यावर तासनतास कॉल वेटिंगवर असतो. अशा उमेदवारांच्या तक्रारी आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे उमेदवार सायबर कॅफेमध्ये उशिरापर्यंत थांबून अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिस भरतीसाठी उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी एकच दिवस शिल्लक आहे;  मात्र वेबसाईट सतत हॅंग होणे आणि सर्व्हर डाउन होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अर्ज भरता येत नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवण्याची मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular