आयुष्मान खुराना बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या बानरचे चित्रपट करून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आता या अभिनेत्याचा ‘अॅन अॅक्शन हिरो’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आयुष्मान सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर उभा असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये आयुष्मानच्या भोवती चाहत्यांची मोठी गर्दी दिसत आहे.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की अभिनेता त्याच्या वाहनाच्या छतावरून बाहेर आला आहे आणि मन्नतकडे पाहतो आणि किंग खानच्या शैलीत त्याचे दोन्ही हात पसरून पोझ देतो. आयुष्मानला शाहरुखच्या स्टाईलमध्ये पोज देताना पाहून चाहतेही खूप उत्साहित झाले.
याआधी आयुष्मानने इन्स्टाग्रामवर त्याच्या अकाऊंटवर स्वतःचा एक फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये तो शाहरुखच्या घराबाहेर दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा मी मन्नत जवळून जात होतो, तेव्हा मी मन्नत मागितली होती’ #AnActionHero #2ndDecember #SRKian’. आयुष्मान खुरानाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. तुझी सुद्धा मन्नत लवकरच पूर्ण होईल. अशी काही चाहत्यांनी कमेंट केली आहे.
आयुष्मान खुरानाच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर, तो पुन्हा एकदा ‘अॅन अॅक्शन हिरो’ द्वारे चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २ डिसेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या आयुष्मान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावरही चाहते त्याला या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा देत आहेत.