24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriगांजा बाळगण्याप्रकरणी, संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

गांजा बाळगण्याप्रकरणी, संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

रत्नागिरी शहरातील मच्छी मार्केट जवळील खान कॉम्प्लेक्समध्ये गांजाची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी डीबी स्कॉड सोबत खान कॉम्प्लेक्स येथे पोहोचले.

या ठिकाणी कारवाई करत संशयित बिलाल अश्रफ शेख, रा. मच्छी मार्केट, सलमान लियाकत कोतवडेकर, रा. मिरकरवाडा जेटी आणि संजय ठिका राणा रा. मिरकरवाडा, मूळ नेपाळ, रामपाल भगत राणा सध्या रा. मिरकरवाडा या चौघांना मुद्देमालासह पकडून कारवाई करण्यात आली.

त्यांच्याजवळ गांजाची ६३ छोटी पाकिटे होती ती जप्त करण्यात आली. एकूण १ किलो गांजा जप्त करण्यात आला. रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट येथील खान कॉम्प्लेक्स येथे छापा टाकून शहर पोलिसांनी अंदाजे २० हजार रुपयांच्या गांजा जप्त करून चार संशयितांना ताब्यात घेतलेले.

या प्रकरणी शहर पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या या कारवाईवर, त्यांना न्यायालयासमोर हजार केले असता, त्यांची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती. मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीची  मुदत संपल्याने पुन्हा त्या चार संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, अजून २ दिवस त्यांना पोलीस कोठडीची शिक्षा वाढ करण्यात आली आहे.

रत्नागिरी पोलीस अशा घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल जास्तच सतर्क असल्याने, वेळीच त्या गुन्हेगारांची आणि असल्या अवैध गुन्ह्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यात यशस्वी होत आहेत. सदर प्रकरणाबाबत यामध्ये अजून कोण कोण सामील आहेत, एवढेच अंमली पदार्थ अवैध्यारीत्या विक्रीसाठी आहेत कि अजून कुठे साठा करण्यात आला आहे, अजून कोणी साथीदार, पुरवठादार आहेत का याबाबत अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular