24.7 C
Ratnagiri
Tuesday, December 2, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriलांज्यात रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास पोलिस बंदोबस्तात प्रारंभ

लांज्यात रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास पोलिस बंदोबस्तात प्रारंभ

या कारवाईची सुरुवात तहसीलदार कार्यालयासमोरील परिसरात केलेल्या अतिक्रमणांपासून करण्यात आली.

मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरात रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे गुरुवारी ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महाम ार्ग विभागाने हटविण्यास सुरुवात केली. नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि कडक पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. संपूर्ण दिवसभरात १२ दुकानांचे अतिक्रमण तोडण्यात आले. ही कारवाई करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी रत्नागिरी येथून पोलिसांचे दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाल्यानंतर आपले साहित्य काढून घेण्यासाठी संबंधित खोकेधारकांची धावपळ सुरू झाली. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातील अतिक्रमणे ३ जुलैपर्यंत हटवावीत अन्यथा पोलीस बंदोबस्तात ती हटविण्यात येतील. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली.

या कारवाईची सुरुवात तहसीलदार कार्यालयासमोरील परिसरात केलेल्या अतिक्रमणांपासून करण्यात आली. याठिकाणी असणाऱ्या टपऱ्या, दुकानाचे फलक हटविण्यात आले. कारवाई सुरू होतांच आजूबाजूच्या परिसरातील दुकानांचे साहित्य काढून घेण्यासाठी संबंधित खोकेधारकांची धावपळ सुरू झाली. व्यावसायिकांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या दुकानांची शेड काढून टाकण्यात आल्याने त्यांना मात्र अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, ही अतिक्रमणे हटाव मोहीम यापुढे देखील सुरूच राहणार असून शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुतर्फा असलेली रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचें राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. गुरुवारी संपूर्ण दिवसभरात १२ दुकानांची अतिक्रमणे हटविण्यात आली. अतिक्रमणे हटाव मोहिमेनंतर संबंधित फेरीवाले व्यापारी यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, युवासेना तालुका अधिकारी अभिजित राजेशिर्के, भाजपचे माजी नगरसेवक संजय यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

या चर्चेदरम्यान जवळ आलेल्या गणपती सणापर्यंत आम्हाला मुदत वाढवून द्या, त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या खाली बसणारे व्यापारी यांच्यावर तुर्तास कारवाई करून नका असे सांगण्यात आले. परंतु उप अभियंता कुलकर्णी यांनी कारवाईला मुदत वाढ मिळणार नसल्याचे सांगत पुलाखालील व्यापाऱ्यांसंदर्भात वरिष्ठांशी बोलून आपणांस कळविण्यात येईल असे उपस्थितांना सांगितले. त्याला फेरीवाले व्यापारी यांनी संमती दर्शविली. दरम्यान, या कारवाई प्रसंगी उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग आर. पी. कुलकर्णी, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे, ठेकेदार कंपनी ईगल इन्फ्राचे साईट सुपरवायझर नरेश सितलानी यांच्यासह लांजा नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular