25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriरत्नागिरीत पोलिसांचा फिटनेस फंडा

रत्नागिरीत पोलिसांचा फिटनेस फंडा

रत्नागिरीत पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.

खाकी वर्दीमध्ये पोलिस अधिक रूबाबदार दिसतात; परंतु अनेक पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाढत्या डेऱ्यामुळे (पोटामुळे) हा रुबाब कमी होतो. पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फिटनेस उत्तम राहावा यासाठी आता पोलिस दलाला ‘फिट राइज ७५’ हा ७५ दिवसांचा फिटनेस कार्यक्रम घेण्यात आला आहे. रत्नागिरीत पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. फ्लॅग ऑफ समारंभ करून शुक्रवारी (ता.२७) सकाळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या उपक्रमाचा आरंभ झाला.

फिट राइज ७५ हा एक निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी पोलिस अधिकारी, अमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ७५ दिवसांचा विविध फिटनेस आव्हाने असलेला कार्यक्रम आहे. सकाळी पोलिस मुख्यालय येथे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते फिटनेस कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पोलिस मुख्यालय-जयस्तंभ-भाट्ये पूल- नारळ संशोधन केंद्र व परत पोलिस मुख्यालय असे ५ किमीची फिटनेस दौड करण्यात आली. त्यामध्ये १६ पोलिस अधिकारी व ११५ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

Most Popular