25.2 C
Ratnagiri
Sunday, December 7, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriपुरातन मंदिरामध्ये चोरी करताना, ग्रामस्थांनी पाठलाग करून चोराला पकडले

पुरातन मंदिरामध्ये चोरी करताना, ग्रामस्थांनी पाठलाग करून चोराला पकडले

रत्नागिरी जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून विविध देवस्थानाच्या दानपेट्या फोडणे, देवतांच्या सोन्या चांदीचा मुलामा दिलेल्या मूर्ती चोरून नेणे अशा घटना काही दिवसांच्या फरकाने घडतच आहेत. अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी एकत्रित पहारा देणे देखील सुरु केले आहे. पोलीस देखील अशा प्रकारच्या भुरट्या चोरांवर लक्ष ठेवून असून त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागावर आहेत.

चोरट्यांच्या नजरेत जास्त करून पुरातन मंदिर असतात. एकतर दानपेटीमध्ये जमा असलेली सर्व रक्कम त्यांना मिळतेच अधिक पुरातन मूर्ती विक्रीमुळे जास्त पैसे मिळतात. काही वेळा इतकी वर्षे जतन केलेल्या मुर्त्यांची या चोरट्यांमुळे विटंबना केली जाते. परंतु या चोरांवर आता ग्रामस्थ आणि पोलिसांची सुद्धा करडी नजर आहे.

संगमेश्वर तालुक्यातील पुरातन मंदिरे फोडून दानपेटी, मौल्यवान दागिने आणि मुर्ती लंपास करणाऱ्या चोरट्यामुळे पोलीस त्रस्त झाले होते. पिरंदवणे येथील एका पुरातन मंदिरामध्ये बुधवारी सकाळी दानपेटी फोडून पैसे लांबवण्याचा प्रयत्नात असलेल्या चोरट्याला संगमेश्वर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करून पकडले आहे. जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या चोऱ्या काही प्रमाणांत उघड होण्याचे संकेत मिळत आहेत अशी पोलिसांना आशा आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर केलेल्या चौकशीमध्ये पिरंदवणे येथील श्रीदेव महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करून पळून गेल्याचे त्याने कबूल केले आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील पुरातन मंदिरातील चोऱ्यांचे गूढ उकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संशयित आरोपीचे नाव सुभाष पांडुरंग कदम असल्याचे संगमेश्वर पोलिस निरीक्षक झावरे यांनी दिलेल्या माहितीमध्ये कळले आहे. त्यामुळे या सापडलेल्या संशयितामुळे, आत्ता अनेक मंदिरांमध्ये घडलेल्या चोरींची पाळेमुळे शोधण्यात पोलिसांना नक्कीच यश मिळणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular