24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriरत्नागिरीत ई-सिगारेट विक्रीवर पोलिसांचा छापा...

रत्नागिरीत ई-सिगारेट विक्रीवर पोलिसांचा छापा…

अनेकदा मुलांच्या दप्तरांमध्येही त्या सापडत होत्या.

विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या ई-सिगारेटच्या व्यसनाकडे लक्ष वेधून रत्नागिरी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहराच्या तेली आळी नाका येथील एका जनरल स्टोअरवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ लाख ७२ हजार ५०० रुपये किमतीच्या ६९ ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दुकानमालक गोविंद दिनेश गजरा याला अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील शाळकरी मुलांमध्ये कायद्याने प्रतिबंधित असलेल्या ई-सिगारेटच्या सेवनाचे प्रमाण वाढले होते. अनेकदा मुलांच्या दप्तरांमध्येही त्या सापडत होत्या. याबाबत शाळांमधील शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी ई-सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले. दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी, या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, तेली आळी नाका येथील जय गगनगिरी जनरल स्टोअरमध्ये ई-सिगारेटची विक्री होत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ दुकानावर छापा टाकला. या छाप्यात दुकानाचा मालक गोविंद गजरा याच्याकडून १ लाख ७२ हजार ५०० रुपये किमतीच्या ६९ ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या.

ईलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठा आणि जाहिरात) कायदा २०१९ कलम ७व ८ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सपोफौ दिपक साळवी, पोहवा अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, प्रशांत पाटील आणि पोकों अमित पालवे यांचा समावेश होता. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शाळा-कॉलेज परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांचा परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३ नुसार कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी नागरिकांना आणि शिक्षकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची उत्पादने विक्री किंवा सेवन करताना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

RELATED ARTICLES

Most Popular