27.3 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

गणेशोत्सवात ‘कोरे’चा प्रवाशांना दिलासा…

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष...

चिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

पालिकेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक...

मुंबईतून ‘रो-रो बोट’ साडेसात तासांत रत्नागिरीत…

मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवेची चाचणी...
HomeKhedवैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे खेडमधील राजकीय समीकरणे बदलणार

वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे खेडमधील राजकीय समीकरणे बदलणार

कार्यकर्त्यांमध्ये या घोषणेमुळे उत्साहाचे वातावरण आहे.

खेड तालुक्यातील राजकारणाला नवे वळण देणारी मोठी घटना उद्या घडणार आहे. माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे बडतर्फ नेते वैभव खेडेकर येत्या. ४ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी सोमवारी खेड येथे पत्रकार परिषदेत केली. सोमवारी दुपारी ना. राणे खेडला दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर राणेंनी ‘राजवैभव प्रतिष्ठान’च्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले तसेच वैभव खेडेकर यांच्या भडगाव येथील निवासस्थानी जाऊन गणेशमूर्तीची पूजा केली. पत्रकार परिषदेत मोठी घोषणा यानंतर भरणे येथील साई रिसॉर्टमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, वैभव खेडेकर हे खेड तालुक्यातील लोकप्रिय आणि लढवय्ये नेतृत्व आहे.

मनसेने त्यांना अन्यायकारकपणे दूर केले. आता ते भाजपसोबत काम करताना तालुक्याच्या विकासासाठी अधिक जोमाने पुढे येतील. येत्या ४ सप्टेंबर रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा होईल. त्यांच्या भव्य या सोहळ्यात खेड पक्षप्रवेश तालुक्यातील अनेक म ाजी मनसे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत. उपजिल्हा प्रमुख संतोष नलावडे, तालुकाध्यक्ष निलेश बामणे, तसेच सुबोध जाधव, अविनाश सौंदळकर यांच्यासह मोठा कार्यकर्ता गट भाजपमध्ये जाणार आहे.

तालुक्यातील समीकरणे बदलणार – खेड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून खेडेकर यांच्या पुढील पाऊलावर चर्चा सुरू होती. मनसेतून बडतर्फीनंतरं त्यांना कोणता राजकीय आसरा मिळणार, हा प्रश्न सर्वांसमोर होता. अखेर भाजपने त्यांना आपल्या गळ्यात घांतले असून, यामुळे तालुक्यातील आगामी निवडणुकीचे राजकीय चित्र बदलणार आहे. भाजपला स्थानिक पातळीवर बळकट कार्यकर्त्यांचा आधार मिळणार आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (दोन्ही गट) यांच्या समीकरणांमध्ये ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला तालुक्यात ग्रामीण पातळीवर अधिक मजबूत पाय रोवता येतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया – कार्यकर्त्यांमध्ये या घोषणेमुळे उत्साहाचे वातावरण आहे. संतोष नलावडे यांनी सांगितले की, आम्ही सर्व कार्यकर्ते वैभव खेडेकर यांच्यासोबत होतो आणि पुढेही राहणार आहोत. भाजपमध्ये प्रवेश करून आम्ही तालुक्यातील विकासाच्या लढाईसाठी अधिक बळकट होऊ. खेड तालुक्यात भाजपची संघटना ताकदवान होईल. खेडेकर यांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्यकर्त्यांचा ओढा यामुळे भाजपला थेट फायदा होणार आहे, असे अनेक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular