21.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraजि.प. पंचायत समिती निवडणुकांचे वेध दिवाळीनंतर सुरू होणार राजकीय शिमगा

जि.प. पंचायत समिती निवडणुकांचे वेध दिवाळीनंतर सुरू होणार राजकीय शिमगा

गावोगावी गाठीभेटी, बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. येणाऱ्या निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीवेळी वापरलेली मतदारयादी वापरण्यात येणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले असून, दिवाळी संपल्यानंतर राजकीय शिमगा सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, २२ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका विहित वेळेत पार पाडण्याचे निर्देश दिल्यानंतर निवडणूक विभागाकडूनही निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या आदेशानुसार १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या न्यायालयाच्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार मतदार यादीचे विभाजन करण्याची कार्यवाही करतील.

असा आहे कार्यक्रम – नव्या मतदारयादी कार्यक्रमानुसार ८ ऑक्टोबर रोजी गणनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. ८ ते १४ या कालावधीत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येतील. २७ ऑक्टोबर रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करतील. त्याच दिवशी मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात – येईल.

मतदार याद्यांवर लक्ष – विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ घालण्यात आल्याचा गंभीर आरोप देश व राज्य पातळीवर विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या मुद्यांवर आता जिल्हा, तालुका पातळीवरही जोरदार चर्चा सुरू आहे, त्यामुळे लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणुकीच्या वेळीही सर्व राजकीय पक्षांचे मतदार याद्यांवर विशेष लक्ष राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणूक विभागालाही यावर बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.

गावोगावी बैठका सुरू – जिल्हा परिषद, पंचायत १ समित्यांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आतापासूनच उमेदवारांकडून वरिष्ठांची आतापासून इच्छुक मनधरणी सुरू झाली आहे, तसेच गावोगावी गाठीभेटी, बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवातही त्याची झलक अनेक ठिकाणी दिसली. आगामी नवरात्र उत्सव आणि दिवाळीतही राजकीय उत्सव पहायला मिळतील आणि दिवाळीनंतर राजकीय शिमगा सुरू होईल, अशी चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular