केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर नाशिक पोलिसांनी अटक केली. यानंतर अनेकांनी सदर प्रकरणावर मौन सोडले आहे. शिवसेना आम. वैभव नाईक यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, नारायण राणेना कायदा काय असतो हे आता नक्कीच कळून चुकलं असेल त्याचप्रमाणे नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना शिवसेनेची रस्त्यावरची ताकद काय आहे हे चांगलच अनुभवलायला मिळाले असेल, असा सूचक टोला लगावला.
भास्कर जाधव यांनी सुद्धा या प्रकरणावर आपले सुस्पष्ट मत मांडले आहे, त म्हणाले कि, मी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सांगितलं आहे कि, नारायण राणे आणि त्यांचे ते दोन पुत्र, त्यांना पुत्रं म्हणायचं की आणखी काही म्हणयाचं हे ज्याचे त्याने ठरवा. कोकणाच्या संस्काराला लागलेला महाकलंक म्हणजे हे तिघे. राणे आणि त्यांच्या मुलांनी केलेली वक्तव्ये चुकीची आहेत. केंद्रीय मंत्री म्हणूनही राणेचं वक्तव्य पूर्णत: चुकीचच आहे. पण हे पहिल्यांदीच नव्हे, तर यापूर्वीही त्यांनी अनेकदा अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये वक्तव्य केलेली आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, ज्या तर्हेने शिशुपालाचे १०० गुन्हे पूर्ण झाले होते, त्याचप्रमाणे राणेंचे सुद्धा शंभर गुन्हे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्राची माती आणि वैचारिक भूमिका राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच दिला आहे.
नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्भवलेल्या प्रक्षोभावरून भाजप पक्ष नेते सुधीर मुनगंटीवारांनी हे देखील व्यक्त झाले आहेत. राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटलं की, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत. वैयक्तिक मतभेद असावेत पण मनभेद नकोत असा टोला देखील त्यांनी राणेंना लगावला आहे. त्याचसोबत भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील अशी उद्रेकाची भूमिका न बाळगता, संयम ठेवावा. नेत्यांवरील केसेस कशाही मागे घेतल्या जातात, मात्र कार्यकर्त्यांवरच्या केसेस आजन्म तशाच राहतात, भविष्यामध्ये या गोष्टीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असं वक्तव्य देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.