23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraयुआयडीसाठी नवीन मोबाईल अ‍ॅप लाँच

युआयडीसाठी नवीन मोबाईल अ‍ॅप लाँच

कोणतेही शासकीय, निमशासकीय, खाजगी काम करायचे असेल तर आवश्यक कागदपत्रांपैन्की एक असलेले आधार कार्ड आता कुठेही ऑनलाईन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कागदपत्राची हार्ड कॉपी सगळीकडे बाळगणे गरजेचे नाही. एक संभाव्य शक्यता म्हणून जवळपास मुळ कागदपत्रे बाळगणे कधीही योग्यच. पण आत्ता यूनिट आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात UIDAI ने आधार सर्विस संबंधित mAadhaar हे मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. mAadhaar  हे मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर  आणि Apple अ‍ॅप स्टोअर वरुन डाउनलोड करता येणार आहे.

अँड्रॉईड आणि iOS युजर्ससाठी हे मोबाईल अ‍ॅप उपलब्ध आहे. युजर  mAadhaar अ‍ॅपद्वारे फोनवरच सर्व आधार डिटेल्स अपडेट करू शकतात. mAadhaar मुळे प्रत्येक वेळी आधारकार्डची हार्ड कॉपी सोबत बाळगण्याची गरज पडणार नाही. mAadhaar डाउनलोड करुन त्याची सॉफ्ट कॉपी ठेवता येते. एकदा फोनमध्ये mAadhaar app डाउनलोड केल्यानंतर, आधार प्रोफाईल अ‍ॅपवर स्टोर होईल. यामध्ये रजिस्टर्ड नंबर,  नाव, पत्ता, लिंग, फोटो आणि इतर डिटेल्स सामिल आहेत.

हे मोबाईल अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्याची पद्धत देखील सोपी आहे, ती पाहूया खालीलप्रमाणे-mAadhaar UIDAI अ‍ॅप निवडा आणि इन्स्टॉल करा. mAadhaar ओपन केल्यानंतर एक फिलिंग फॉर्म दिसेल. त्यामध्ये पासवर्ड तयार करायचा. mAadhaar शी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी प्रथम आधार कार्ड स्कॅन करून घ्यावे किंवा १२ अंकी आधार नंबर टाईप करावा लागेल. UIDAI शी जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच नंबर इथे द्यावा लागतो. संपूर्ण डिटेल्स भरून झाल्यानंतर वेरिफिकेशनवर क्लिक करून,  त्यानंतर ओटीपी प्राप्त झाल्यावर प्रोसेस पूर्ण करण्यासाठी दर्शविलेल्या जागी ओटीपी टाईप करावे.

mAadhaar मोबाईल अ‍ॅपची असेलली वैशिष्ट्य पहायला गेले तर, एनरोलमेंट सेंटरचं लोकेशन देखील पाहता येते. आधार सर्विस SMS द्वारे वापरता येते. एक युजर एका फोनवर जास्तीत जास्त ५ प्रोफाईल तयार करू शकतो. बायोमेट्रिक्स लॉक-अनलॉक करता येतील. आधार लॉकिंग करता येईल. प्रोफाईल अपडेट करता येईल. रिक्वेस्ट स्टेटस चेक करता येईल.

जर वापरानंतर तुम्हाला mAadhaar हे मोबाईल अ‍ॅपची डिलीट करायचे असेल तर, mAadhaar मोबाईल अ‍ॅपची उघडून, प्रोफाईलवर वरच्या बाजूला असलेल्या ड्रॉप-डाउन मेन्यूवर क्लिक केल्यावर डिलीट प्रोफाईल पर्याय निवडायचा. तिथे सुद्धा ऑथेंटिकेशनसाठी पासवर्ड टाकल्यावर प्रोफाईल डिलीट करता येते.

RELATED ARTICLES

Most Popular