22.8 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriआरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

अवजड वाहने बेफिकीरपणे चालवण्यात येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे दिलेली आश्वासने हवेत विरल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेल्या मुंबईकरांना चांगलाच फटका बसला आहे. प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या दूरवस्थेबाबत संगमेश्वर सोनवी पुलाजवळ उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी महामार्ग अभियंता अनामिका जाधव आणि अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांनी ठेकेदार कंपनीला फटकारले होते तसेच खड्डे बुजवणे, डांबरीकरण करणे, गौण खनिज भरलेल्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे यांसह सर्व कामे गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते; मात्र प्रत्यक्षात हे आश्वासन पाळले गेले नाही.

सध्या रस्त्यावर केवळ वरवर खडी टाकून तात्पुरता तोडगा काढला जात असल्याने खड्डे पुन्हा दिसू लागले आले आहेत. परिणामी, वाहनधारकांना सावकाश गतीने प्रवास करावा लागत असून, त्यातून वाहतूककोंडी निर्माण होत आहे. यासाठी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय महामार्गावरून अवजड वाहने बेफिकीरपणे चालवण्यात येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेकांना जीव गमवावे लागलेले आहेत. असे असतानाही महामार्ग विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार सतत दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांसह प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular