विद्युत पोलावर ट्रक आदळला आणि अर्धा ‘अधिक चिपळूण रात्रीच अंधारात, गेला… तब्बल सत्तावीस तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करून महावितरणची आपत्ती यंत्रणा किती बोगस आहे हे दाखवून दिले असून महावितरणने वसुली केली. मात्र व्यापारी नागरिक याना मोठ्या नुकसानीला सामोरी जावे लागले असून व्यापारी नागरिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. तर आ. निकम यांनी ही सबधित यंत्रणेची झाडाझडती घेतली असून नगरपालिका आणि महावितरण या विरोधात प्रचंड संताप निर्माण झाला असून याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
ट्रक आदळला अन वीज गायब – भर बाजारपेठ येथे खेडेकर क्रीडासंकुल येथे असणाऱ्या वीज खांबावर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक ट्रक आदळला आणि बाजारपेठ खेड या सह अर्धा अधिक चिपळूण काळोखात गेला होता. रात्री दोन वाजताच अर्धा अधिक चिपळूण जागे झाले होते. खरे तर महावितरणची आपत्ती निवारण यंत्रणा कार्यान्वित असेल असे साऱ्यांना वाटले होते. त्यामुळे एक खांब बदलून पहाटे पर्यंत तरी वीजपुरवठा सुरळीत होईल असे वाटले होते. मात्र महावितरणचा कारभार किती भगार झाला आहे. हे साऱ्या चिपळूणकरना पहावयास मिळाले आणि याच मुळे व्यापारी नागरिक प्रचंड आक्रमक झाले होते.
प्रचंड नुकसान – रात्रीच वीज गेल्याने आणि तेही भर बाजारपेठमधील त्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी अंघोळीला नव्हे तर पिण्यास ही पाणी नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पाणी नसल्याने नागरिकांनी नगरपालिकेकडे धाव घेतली. मात्र तिथेही वैभवशाली कारभार पहावयास मिळाला असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
विद्युत पंप नाही – करोडो रुपये विकासकामांवर खर्च करणाऱ्या नपाकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याची विनंती केली. मात्र बिल्डिंगवर पाणी पोहचवण्यासाठी विद्युत पंप नसल्याचे सामोरी येताच माजी नगरसेवक अरुणशेठ भोजन यांनी मी माझ्या पैशाने पंप देतो पण बिल्डिंगला पाणी पुरवठा करा अशी विनंती केली. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. चिपळूणचा वैभवशाली विकास म्हणून गवगवा होत असताना अशी परिस्थिती निर्माण झाल्या नंतर साधे पाणी ही बिल्डिंगवर न.पा. देऊ शकत नाही हे दुर्दव्य असल्याचे जेष्ठ व्यापारी आणि माजी नगरसेवक श्री अरुणशेठ भोजने यांनी सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्तावीस तास नेमके कशाला लागले याचेच कोडे साऱ्यांना पडले असून महावितरणच्या नावाने व्यापारी नागरिक यांनी मात्र आज लाखोली वाहिली आहे
नुकसान कोण देणार – महावितरणने ट्रक मालकाकडून आपले नुकसान वसुल करून घेतले. वसुलीत दिरंगाई केली नाही. मात्र जनतेला वीज पुरवठा करताना दिरंगाई करण्यात आली आहे. मोत्र गलथान कारभारामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून याची भरपाई कोण करणार असा सवाल करण्यात येत आहे. महावितरणचा हेल्पलाईन नंबरवर अनेकांनी कॉल केला. मात्र कोणतेही उत्तर नाही माजी नगरसेवक अरुणशेठ भोजने यांनी चाळीस कॉल केले त्या नंतर रिप्लाय आला मात्र तो ऐकून भोजने निरुत्तरच झाले जर कामगार नसतील तर हेल्पलाईन नंबर ठेवला कशाला असा सवाल केला असून या साऱ्याच उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे
आ. निकामांनी केली झाडाझडती – आ शेखर निकम वेगवेगळ्या कार्यक्रमात बिझी होते. त्याना या साऱ्यांची माहिती उशिरा प्राप्त झाली. मात्र तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांची त्यांनी झाडाझडती केली असेच जर होणार असेल तर कठोर कारवाई करेल असा दम भरला. यावेळी त्यानी सांगितले की, याची माहिती वेळीच मि ळाली असती तर बरे झाले असते मात्र तसे झाले नाही.