गेल्या काही दिवसांपासून वेबसिरीजच्या दुनियेतच नाही तर अनेक कार्यक्रमातून,मुलाखतींमधून आणि सर्वात महत्वाच म्हणजे सोशल मीडियावर ज्या मराठी अभिनेत्रीची सर्वात अधिक चर्चा आहे ती म्हणजे प्राजक्ता माळी हिने रानबाजार या वेब सिरीज मधील तिनं साकारलेल्या भूमिकेचं जेवढं कौतूक झालं तेवढीच तिच्यावर टिकाही झाली. पण या सर्वच गोष्टींना तिनं खूप चांगल्या पद्धतीनं तोंड दिलं. ना ट्रोलर्सला प्रतिउत्तर देताना तिचा आवाज चढला,ना मुलाखतीत तिरकस प्रश्नांना उत्तरं देताना तिची चिडचिड झाली.
चेहऱ्यावर कायम हसू ठेवून तिनं अनेक तिखट टिकांना व्यवस्थित टोलवून लावलं. असो, सध्या प्राजक्ता माळी हिमाचलमध्ये सोलो ट्रिपला गेलीय हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. करण सध्या सोशल मीडियावर आपल्यापैकी अनेक जण तिला फॉलो करीत असतील. तर त्या हिमाचलमधनं तिनं आपल्या महाराष्ट्रासाठी प्रेमाचा संदेश धाडला आहे.
प्राजक्ता माळी गेल्या ५ दिवसांपासून हिमाचलच्या सुंदर निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहे. पण आता महाराष्ट्राची आठवण तिला अतिशय सतावत आहे. त्यामुळेच तिनं महाराष्ट्रासाठी खास पोस्ट लिहिली आहे, ज्यामुळे तिचे चाहते मात्र तिचं कौतूक करताना दिसत आहेत.
सध्या प्राजक्ताला महाराष्ट्राची हास्यजत्रा शो ब्रेकवर गेल्यानं खूप निवांत वेळ आहे. कारण सिनेमांपेंक्षा, वेब सिरीजपेक्षा छोट्या पडद्यासाठीचं शूटिंग खूप कटकटीच असत. नुसती धावपळ असते. त्यामुळे यातून निवांत वेळ मिळताच प्राजक्ताने हिमाचल गाठलं. गेले काही दिवस, तिथले सुंदर फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करतच होती. पण त्यातच आज तिनं एक पोस्ट शेअर करत म्हटलंय की, मला महाराष्ट्रात पळून यावंस वाटतंय, शेवटी मी सह्याद्रीची मुलगी असं देखील तिनं म्हटलं आहे.
प्राजक्तानं हिमाचलचे काही फोटो पोस्ट करत लिहिलं आहे, ”पण खरं सांगू कोणत्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीत जास्त ५ ते ६ दिवस आनंद घेऊ शकते. नंतर काम नसेल तर मला महाराष्ट्राची कडकडून आठवण येऊ लागते. हो आत्ताच पळून यावं इतकी आठवण येतेय. देवा. कसं होणार माझं”