27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeMaharashtraप्रवीण दरेकर गुन्हा प्रकरणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल

प्रवीण दरेकर गुन्हा प्रकरणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल

बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे,  नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खोचक सल्ला दिला.

सहकारी बँकेतील घोटाळय़ाप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायदेशीरच आहे. बँकेवर दरोडा टाकणाऱया दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. विधिमंडळाच्या आवारात नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रवीण दरेकर यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अशा अनेक विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, मुंबई बँकेची लूट करण्यात आली.

लेखापरीक्षण अहवालात तसे स्पष्ट झाले आहे. सहकार विभागाला कारवाई करण्याचा अधिकार असून त्यानुसारच सहकार विभागाने ही कारवाई केलेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते ‘तेव्हा करेल तो भरेल’ असे म्हणणारे भाजपचे नेते आता दरेकर प्रकरणावरून विनाकारण टीका करत असल्याचे नाना पटोले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

मुंबई सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे,  नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खोचक सल्ला दिला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यपालांवरही टीका केली आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा सवाल पटोले यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular