विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोटनिवडणुका आणि आगामी काळात मुदती संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू आहे. येथील तहसील कार्यालयाकडून त्या त्या ग्रामपंचायत कार्यालयांसह तलाठी सजा कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोटनिवडणुका घेण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत. त्याच्या जोडीने वर्षभरामध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
पंचवार्षिक निवडणुकांमध्ये तालुक्यातील कणेरी, शेढे, कोंड्येंतर्फे राजापूर, भू, तेरवण, खिणगिणी, दसूर, आंबोळगड, पेंडखळे अशा ग्रापंचायती, तर पोटनिवडणुका होऊ घातलेल्यांमध्ये कोळवणखडी, नाणार, झयें, वडदहसोळ, येळवण, वाल्ये, पांगरीखुर्द, रायपाटण, हातिवले, तळगाव, खरवते, मोसम, केळवली, ससाळे, माडबन, भालावली, उन्हाळे, कशेळी, शिवणेखुर्द, फुफेरे, शिळ व कोंड्येतर्फ सौंदळ अशा २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुका होत असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये प्रारूप मतदार यादी १९ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या प्रारूप मतदार याद्यांवर २४ मार्चपर्यंत हरकती व सूचना दाखल करावयाच्या असून, त्यावर चर्चा अन् निर्णय होऊन २६ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारूप मतदार याद्यांवर ज्यांना हरकती दाखल करावयाच्या आहेत त्यांनी निर्धारित कालावधीमध्ये हरकती दाखल करण्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
प्रशासन यंत्रणा सज्ज – राजापुरातील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोटनिवडणुका आणि आगामी काळात मुदती संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे.