27.6 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriदुर्गम वाड्या, स्त्यांमध्ये जाण्यासाठी रस्ते तयार करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

दुर्गम वाड्या, स्त्यांमध्ये जाण्यासाठी रस्ते तयार करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लांजा - राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील राजापूर तालुक्यातील ताम्हाणे धनगरवाडीमध्ये आजही रस्ता नाही.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लांजा राजापूर – साखरपा विधानसभा मतदारसंघमधील अनेक दुर्गम वाड्या वस्त्यांमध्ये जाण्यासाठी रस्ते नसलेल्या भागात सर्व्हे करून त्याठिकाणी कम भीतकमी कच्चे रस्ते तयार करावेत, अशी मागणी करणारे निवेदन लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लांजा तहसीलदार यांच्यामार्फत गुरुवारी २० जुलै रोजी देण्यात आले. लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून जी र्दुघटना घडली आहे ती अत्यंत दुदैवी आहे.

दुर्दैवाने या ठिकाणी मदत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मशिनरी पोहोचू शकत नाही. त्यामुळे मदत करण्यास अडचण निर्माण होत आहेत. देश स्वतंत्र होवून ७५ वर्षे झाली तरी आजही काही डोंगराळ भागात रस्ते नाहीत ही वस्तुस्थिती आहे. परंतु अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपणास त्याची जाणीव होत आहे. लांजा – राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील राजापूर तालुक्यातील ताम्हाणे धनगरवाडीमध्ये आजही रस्ता नाही. याठिकाणच्या लोकांना आजही रोज शाळा व इतर कारणांसाठी २ ते ३ कि.मी. अंतर दररोज पायपीट करावी लागत आहे या वाड्यांमध्ये पुरेशी लोकसंख्या नसल्याने याठिकाणी विकास निधी खर्च करण्यात येत नाही. त्यामुळे तेथील लोकांना गैरसोयीला त्रास सहन करावा लागत आहे.

तरी अशा डोंगराळ भागातील दुर्गम वाड्या वस्त्या असतील त्यांचा सर्व्हे करून तेथे रस्ते तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरून अशा दुर्गम ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्यास मदत करण्यास अडचण निर्माण होणार नाही. डोंगराळ भागातील लोकसंख्येचा निकषाचा विचार न करता डोंगराळ भागात रस्ते तयार करुन येथील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, हे निवेदन देताना लांजा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा धावणे व माजी सामाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular