25.6 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

सुनावणीपूर्वीच फेरसर्वेक्षणाला विरोध – शिवसेना ठाकरे गट

चिपळूण पालिकेने वाढीव घरपट्टीबाबत २८ सप्टेंबरपर्यंत हरकती...

ना. नितेश राणेंना मत्स्योद्योग तर गोगावलेंना रोजगार हमी मंत्रालय

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच शनिवारी रात्री...

प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुहागरात निघाला मोर्चा…

गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील ३ प्राध्यापकांना झालेल्या...
HomeRatnagiriप्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची अजून प्रतीक्षाच

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची अजून प्रतीक्षाच

दिवाळीपूर्वी ही प्रक्रिया होणार की नाही याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

दिवाळीच्या निमित्ताने यंदा १८ दिवस शाळाना सुट्टी असणार आहे. नवरात्री उत्साहात साजरी झाल्यानंतर दिवाळी सुट्टीचे वेध लागले आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळांमधील शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये २५० शिक्षक समाविष्ट आहेत;  मात्र जिल्ह्यातील रिक्त होणाऱ्या पदांमुळे त्यांना अद्याप बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही. ही प्रक्रिया झाल्यानंतर लगेचच जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती. पण अजुनही तसे आदेश ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झालेले नाहीत.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी वैयक्तिक माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरुन घेण्यात आली; मात्र अजूनही अवघड क्षेत्रातील शाळा, रिक्त पदांची माहिती आणि शिक्षकांना हव्या असलेल्या तीस शाळांची यादी भरण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही प्रक्रिया होणार की नाही याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दिवाळीची सुट्टी २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत या कालावधीमध्ये आहे. ८ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असल्याने त्या दिवशीही सलग सुट्टी आली आहे. ९ नोव्हेंबरपासून शाळा पूर्ववत सुरू होणार आहेत.

जिल्ह्यात पावणेसहा हजार शिक्षक आहेत. जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविताना प्रथम अवघड क्षेत्रातील शाळांची यादी अपलोड करण्याचे आदेश देण्यात येतील. त्यानंतर ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरु होईल. पुढील टप्प्यात शिक्षकांची रिक्त पदे यादी भरली जाईल आणि शेवटी इच्छुक शाळांची यादी भरावयास मिळणार आहे. तालुक्यातील रिक्त पदांचा समतोल साधण्यावर यामध्ये विशेष भर राहणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना तालुक्याच्या बाहेर जावे लागण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण, तीन वर्षांपूर्वी झालेल्या ऑनलाईन बदलीमध्ये ८% शिक्षकांना तालुक्याच्या बाहेरच जावे लागले होते.

RELATED ARTICLES

Most Popular