29.8 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

भाट्ये समुद्राच्या पाण्यात खेळणे तरूण तरूणीच्या जीवावर बेतले…

मैत्रिणीसोबत भाट्ये समुद्रात खेळण्याचा आनंद लुटताना पॉलिटेक्नीकच्या...

उदय सामंत यांना मंत्रिपदाची संधी, पदाबाबत उत्सुकता

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या...
HomeRatnagiriप्राथमिक आणि माध्यमिक विभागाकडे शिक्षणाधिकारी नसून, चार्ज प्रभारीकडे

प्राथमिक आणि माध्यमिक विभागाकडे शिक्षणाधिकारी नसून, चार्ज प्रभारीकडे

शिक्षण विभागाच्या समस्यांकडे  एक प्रकारे दुर्लक्षच केले जात आहे. शिक्षण खात्याचा कारभार सर्व राम भरोसे सुरु आहे असे दिसून येते.

रत्नागिरीमधील शिक्षण विभाग आणि त्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला कोणी वालीच राहिला नसल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाकडे शिक्षणाधिकारी नसून, त्याचा चार्ज सध्या प्रभारी पदाकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या समस्यांकडे  एक प्रकारे दुर्लक्षच केले जात आहे. शिक्षण खात्याचा कारभार सर्व राम भरोसे सुरु आहे असे दिसून येते.

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण खात्यातील प्रमुख पदे रिक्त आहेत. तत्कालीन शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांची उपसंचालकपदी पदोन्नती झाल्यामुळे माध्यमिक आणि प्राथमिकची पदे रिक्त राहिली होती. त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. जिल्हा परिषद माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील चार उपशिक्षणाधिकारी पदेही रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग सध्या प्रभारी कारभारावर चालत आहे.

त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्याकडे तर माध्यमिकचा पदभार कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याकडे सोपविण्यात  आला आहे. याबाबतचे पत्र नुकतेच जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. म्हणजे पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला प्राथमिक शिक्षण विभागातील आठ गटशिक्षणधिकारी पदे रिक्तच आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज चालवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

शिक्षकी पेशातील अनेक कामे, बदल्या, ऑफलाईन शिक्षण, ऑनलाईन शिक्षण, पोषण आहार, कोरोनाचा वाढता पराभव, अशा एक न अनेक समस्या शिक्षकांसमोर उभ्या आहेत पण त्यावर ठाम तोडगा  काढण्यासाठी अधिकारी वर्ग मार्ग नाही आहेत. त्यामुळे नक्की यामध्ये शिक्षण विभागाला नक्की कोण वाली मिळणार आहे का ! अशी विचारणा केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular