25.4 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunउपरे तुपाशी आणि स्थानिक उपाशी अशा घोषणा - कोकाकोला कंपनी

उपरे तुपाशी आणि स्थानिक उपाशी अशा घोषणा – कोकाकोला कंपनी

हातामध्ये काळी छत्री आणि छत्रीवर कोकाकोला कंपनीचे नाव.

सनदशीर मार्गांचा अवलंब करत कोकाकोला कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, अशी मागणी करूनही कंपनीकडून नोकरी सोडाच उलट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचा आरोप करत सोमवारी असगणीच्या गावकऱ्यांनी पुन्हा एकदा कंपनी कार्यालयावर निषेध मोर्चा नेला. कंपनीने आत्ताही त्याची दखल न घेतल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करू, असा इशारा असगणी आणि आसपासच्या ग्रामस्थांनी दिला आहे. मोर्चेकऱ्यांच्या हातात काळी छत्री आणि छत्रीवर ‘कोकाकोला कंपनीचा निषेध असा मेसेज झळकत होता. उपरे तुपाशी, स्थानिक उपाशी अशा घोषणा देण्यात येत होत्या. सोमवारी सकाळी असगणी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ एकत्रित आले आणि तिथून मोर्चाला सुरूवात झाली. एमआयडीसीमधील कंपनी कार्यालयावर हा मोर्चा गेला आणि तिथून परत ग्रामपंचायत कार्यालयात आला. या मोर्चात अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते. मोर्चाची सांगता झाल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाबाबत पत्रकारांना माहिती दिली.

सुरूवातीला स्वागत – ग्रामस्थांनी सांगितले की, डिसेंबर २०२३ मध्ये, जेव्हा कोका कोला कंपनीने रत्नागिरी जिल्हातील खेड तालुख्यातील असगणी गावात ग्रीनफिल्ड प्लांटची घोषणा केली, तेव्हा स्थानिक शेतकरी / जमीन मालक यांनी शासन व कंपनीचे स्वागत केले व जमिनीसह सर्व ती आवश्यक मदत केली. त्रिपक्षीय (कंपनी, एमआयडीसी व ग्रामस्थ) बैठकांमध्ये, ग्रामस्थांना ग्रामीण पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधीं इत्यादी विकासाचे आश्वासन देण्यात आले. परंतु जेव्हा प्रत्यक्ष कंपनी उभी राहिली, तेव्हा कंपनी व्यवस्थापनालो नियमित आठवण करून देऊनही, व्यवस्थापनाने जाणूनबुजून हेतुपरस्पर स्थानिकांना रोजगार नाकारण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शांततापूर्ण निषेध – जेव्हा कंपनीने अनेक विनंत्यांनंतरही कोणतीही कारवाई केली नाही, तेव्हा ग्रामस्थांनी शांततापूर्ण निषेध कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कंपनीने ग्रामपंचायत नेतृत्वाशी संपर्क साधला. परंतु दिनांक ३० मे २०२५ रोजीच्या नियोजित द्विपक्षीय बैठकीत कोणतेही सकारात्मक आश्वासन दिले नाही. तथापि, कंपनीने पुन्हा थेट रोजगार देण्यास नकार दिला. बैठक अयशस्वी झाल्यामुळे, समुदायाने निषेध कारवाईची तयारी सुरू केली. परंतु नंतर कंपनीने स्थानिक पोलिस प्रशासनाला खोटी माहिती देवून स्थानिकाना नोटिसा पाठविल्या, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

मूक मोर्चा – या धमकीच्या सूचनांनंतर, ग्राम स्थांनी या कृतीचा निषेध केला आणि मूक मोचनि निषेध करण्याचा निर्णय घेतला, जो अन्याय भरती पद्धती आणि वचनांचे उल्लंघन केल्याच्या विरोधात त्यांच्या प्रतिकाराची कायदेशीर आणि लोकशाही अभिव्यक्ती होती. दिनांक ५ जून २०२५ रोजी तोंडावर काळी पट्टी बांधून संपूर्ण ग्रामस्थ मूक मोर्चात सहभागी झाले. सदर मोर्चा हा अत्यंत शांततेने व कायदा सुव्यवस्थेचे पालन करून काढण्यात आला. तरीही गावच्या सरपंचासह २२ ग्रामस्थ आणि महिलांसह सुमारे ४५० सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व कोका कोला कंपनीच्या दबावाने झालेले आहे, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

पुन्हा एकदा मोर्चा – कंपनी व्यवस्थापनाचा धिक्कार म्हणून सोमवारी दिनांक १४ जुलै २०२५ रोजी जाहीर धिक्कार मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा हा. ग्रामपंचायत असगणी ते एमआयडीसी मार्गाने कोका कोला कंपनीकडून पुनश्च ग्रामपंचायत असगणी येथे आला आणि मोर्चाची सांगता झाली. सदर मोर्चात ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. आता जर कंपनीने दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गाने यापेक्षाही मोठे आंदोलन करू, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

हातामध्ये काळी छत्री आणि छत्रीवर कोकाकोला कंपनीचे नाव – खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील विस्तारित टप्प्यामध्ये कोकाकोला या कंपनीचे काम अंतिम टप्प्यात आले असून कंपनीमध्ये काही प्रमाणात नोकर भरती चालू आहे आणि या नोकर भरती मध्ये स्थानिकांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याच्या निषेधार्थ स्थानिक असगनी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोमवारी पुन्हा जोरदार निदर्शने करत निषेधाच्या घोषणा देत कंपनीवर मोर्चा धडकला. या मोर्चामध्ये असगणी गावातील बहुसंख्य महिलांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यांच्या हातामध्ये काळी छत्री आणि त्या छत्रीवरती कोको कोला कंपनीचा निषेध करणारा मेसेज पाहायला मिळाला.

RELATED ARTICLES

Most Popular