21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeKhedलोटेतील कार्यक्रम महायुतीचा नव्हे, शिदे शिवसेनेचा

लोटेतील कार्यक्रम महायुतीचा नव्हे, शिदे शिवसेनेचा

भूमिपूजन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पाहिल्यास आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खेड तालुक्यातील अतिरिक्त लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रात ३० नोव्हेंबरला हिंदुस्थान कोका-कोला प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तो खासगी कार्यक्रम होता, तो महायुतीचा नव्हता. आयोजकांकडून निमंत्रण न मिळाल्यामुळे भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी मांडली. त्यामुळे कोकणात महायुतीत धुसफूस सुरू असल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. रत्नागिरी बाबाजी जाधव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी रत्नागिरीत ते आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘पालकमंत्री उदय सामंत यांनी कोका-कोला कंपनीच्या भूमिपूजनासंबंधी माझ्याशी दूरध्वनीवरून वैयक्तिक चर्चा केली होती; मात्र त्यानंतर कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे आम्ही उपस्थित राहिलो नाही.

राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून संपर्क साधणे आवश्यक होते; परंतु तो न केल्याने हा कार्यक्रम शिंदे शिवसेनेचा झाला. तसेच भूमिपूजन कार्यक्रमादिवशी राष्ट्रवादी पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन कर्जत (जि. रायगड) येथे होते. हा नियोजित कार्यक्रम असल्याने कार्यक्रम २ डिसेंबरला घ्यावा, असे सुचवण्यात आले होते. जेणेकरून महायुतीमधील घटक पक्ष म्हणून आम्ही सर्वच पदाधिकारी लोटे येथील कार्यक्रमाला हजर राहिलो असतो; परंतु तसे झाले नाही. राज्यात महायुती असल्यामुळे भूमिपूजन कार्यक्रम भाजप-राष्ट्रवादी- शिंदे शिवसेना एकत्रित झाला असता तर यापेक्षा अधिक रंगतदार झाला असता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भूमिपूजन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पाहिल्यास आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजकीय शिष्टाचाराला धरून निमंत्रण पत्रिका काढलेली नाही. सध्या लोटे येथे प्रकल्पाच्या ठिकाणी काहीच जागा नाही. सध्या ७८ एकर जागा कंपनीला देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular