29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriशोधमोहिमेसाठी हेलिकॉप्टरचा प्रस्ताव, ती तरुणी अद्याप बेपत्ताच

शोधमोहिमेसाठी हेलिकॉप्टरचा प्रस्ताव, ती तरुणी अद्याप बेपत्ताच

२९ जूनला या तरुणीने उडी घेत आत्महत्या केली आहे.

शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरून पडलेल्या तरुणीचा अद्याप शोध लागलेला नाही. २९ जूनला या तरुणीने उडी घेत आत्महत्या केल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मागील दहा दिवसांत पोलिस जवान, माऊंटेनिअर्सची टीम, एनडीआएफ शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत; परंतु अतिशय अवघड ठिकाण असल्याने शोध घेणे कठीण आहे म्हणून पोलिसदलाने तटरक्षक दलाकडे हेलिकॉप्टरद्वारे शोध घेऊन मदत करण्याची विनंती केली आहे. नाशिक येथे बँकेत नोकरीला असणारी सुखप्रित धालिवाल ही आपल्या मित्राला भेटण्यासाठी २९ जूनला रत्नागिरीत आली होती. यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तिने आपली चप्पल व स्कार्फ बाजूला ठेवले आणि रत्नदुर्ग किल्ल्यावरील रेलिंगच्या पुढे गेली तसेच यानंतर तिने कठड्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचे पोलिस ठाण्यात वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच तिचे नातेवाईक रत्नागिरीत दाखल झाले होते.

सुखप्रित हिच्या वडिलांनी याप्रकरणी संबंधित मित्राने माझ्या मुलीला फसवल्याचा ठपका ठेवून त्याच्याविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सुखप्रित हिच्या मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सुखप्रित हिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप सुखप्रित बेपत्ता असल्याने तपासकामात अडथळा निर्माण झाला आहे. सुखप्रित ही नाशिक येथे वास्तव्यास असताना तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये तिने आपली व्यथा मांडली होती. पोलिस जवान, माऊंटेनिअर्सची टीम, एनडीआरएफ यांच्याकडून दहा दिवसांत शोधमोहीम राबवली; परंतु ती अजून सापडलेली नाही. या शोधमोहिमेत पोलिसदलाने तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरची मदत मागितली असून, अजून ती मिळालेली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

RELATED ARTICLES

Most Popular